Dasara Melava 2023 Live : कोणी कुठे आणि किती दसरा मेळावे घ्यावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न : धनंजय मुंडे
Dasara Melava 2023 Live Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील दसऱ्याचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Dasara Melava 2023 Live Updates ३० ऑक्टोबर १९६६... ही तीच तारीख आहे, ज्यादिवशी बाळासाहेब ठाकरे नावाच्या वादळाने दसरा मेळाव्याची मुहूर्तमेढ रोवली... त्याला आता ५७ वर्ष झाली... या ५७ वर्षांत दरवर्षी बाळासाहेबांनी केलेल्या भाषणांनी पुढील काही दिवस महाराष्ट्र ढवळून निघायचा... मात्र आता परिस्थिती वेगळी आहे... दोन शिवसेना आहेत आणि दोन दसरा मेळावेही... आज उद्धव ठाकरेंची तोफ शिवतीर्थावरून धडाडणारेय. या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येणारेत. तर दुसरीकडे, शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणारेय. त्यासाठी तब्बल सव्वा लाख कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बीडच्या सावरगाव येथेही पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होणारेय... महाराष्ट्रभर शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर पंकजा मुंडेंचा हा मेळावा होतोय. दरम्यान, उद्धव ठाकरेंची मशाल कुणाला धग देणार, तसेच, एकनाथ शिंदे धनुष्यातून कुणावर बाण सोडणार आणि पंकजा मुंडे मनातली खदखद मांडत कुणाला लक्ष्य करणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेय.
Dasara Melava 2023 : Uddhav Thackeray पुन्हा मुख्यमंत्री होवो, जालन्यावरुन मशाल घेऊन शिवसैनिक मुंबईत
Dasara Melava 2023 : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होवो असं म्हणत जालन्यावरुन मशाल घेऊन शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत.
Dhananjay Munde On Dasara Melava : कोणी कुठे आणि किती दसरा मेळावे घ्यावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न : धनंजय मुंडे
Dhananjay Munde On Dasara Melava : महाराष्ट्रातील जनता आणि शेतकऱ्यांवर जी संकट येणार आहेत त्या संकटात येत्या काळामध्ये दहन व्हावं अशी भावना धनंजय मुंडे यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना व्यक्त केली आहे. यावर्षी दसरा मेळाव्याची संख्या वाढली असून यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की दसरा मेळावा कोणी घ्यावा आणि कुठे घ्यावा हा ज्याचा त्याचा विषय आहे. कोणी दसऱ्यानिमित्त मेळावा घेतो तर कोणी आपल्या श्रद्धेच्या ठिकाणी नतमस्तक होत असतो.























