एक्स्प्लोर

Dasara Melava 2022 : 'आम्ही शिवबाचे धारकरी, शिवसेनेचे मानकरी', शिंदे गटाच गाणं रिलीज, मंत्री गुलाबराव पाटलांची संकल्पना

Dasara Melava 2022 : शिंदे गटाकडून आम्ही शिवबाचे धारकरी, शिवसेनेचे मानकरी' हे गाणं ईड आज रिलीज करण्यात आलं. हे गाणं मंत्री गुलाबराव पाटील यांनी लिहले असून त्यांचीच संकल्पना आहे. 

Dasara Melava 2022 : मुंबईत यंदा पहिल्यांदाच दोन मैदानावर दसरा मेळावा पार पडला असून बिकेसी मैदानावर दसरा मेळावा सुरू होण्यापूर्वी शिंदे गटाकडून उर्जादायी गाणं रिलीज करण्यात आलं. आम्ही शिवबाचे धारकरी, शिवसेनेचे मानकरी' हे गाणं वाजायला सुरवात झाली अन एकच जयघोष मैदानावर घुमू लागला. विशेष म्हणजे हे गाणं मंत्री गुलाबराव पाटील यांनी लिहले असून त्यांचीच संकल्पना आहे. 

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून जोरदार घमासान सुरू होते. आज उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर तर बिकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. दसरा मेळाव्याच्या टिझर पासून अनेक गोष्टींचा उहापोह करण्यात येत होता. अशातच  मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले शिवसेना स्फुर्तिगीत दसरा मेळाव्याच्या सुरवातीला लॉन्च करण्यात आल. "हे गीत म्हणजे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या महान जीवनकार्याला निष्ठावंत शिवसैनिकानं अंतःकरणातून दिलेली मानवंदना आहे. इतकंच नव्हे तर बाळासाहेबांचा शिवधर्माचा, हिंदुत्त्वाचा वारसा पुढे नेण्याचं वचन आहे, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी या गीता बद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, 'या गीताच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवधर्माचा, हिंदुत्त्वाचा वारसा पुढे नेण्याचं वचन आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी मुलखात स्वराज्याचं बीज पेरलं, त्याच ध्यासानं बाळासाहेबांनी मराठी मनांत स्वाभिमानाची ज्वाला पेटविली. शिवकाळापासून अखंड चालत आलेल्या स्वराज्य पालखीची धुरा घेऊन साहेबांनी सुवर्ण इतिहास लिहिला. या पालखीला आपल्या खांद्यावर घेऊन शिवसेनेचा प्रवास सुरू झाला. अन् संकटांच्या वादळातही शिवनीती टिकविण्याचं आव्हान बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांनी पेललं. शिवसेनेचा हाच धगधगता प्रवास हे या  स्फूर्तीगीताचं प्रेरणास्थान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांचा हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहोत. आम्ही शिवसेनेचे मानकरी असं अभिमानानं म्हणताना प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यात आनंद असेल. अन शिवसेनेचा भगवा झेंडा मिरवण्यासाठी त्याला आणखी बळ मिळेल!" या शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

गायक आदर्श शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजाने या गाण्यात अनोखा जोश निर्माण केला आहे. प्रत्येक शिवसैनिकाला आपलंसं वाटणारं, तना-मनात चैतन्य फुलवणारं हे स्फूर्तीगीत आहे. यातील 'शिवसेनेचे मानकरी' ही उपमा प्रत्येक शिवसैनिकाला सुखावणारी आहे. या गीतातून बाळासाहेबांचा अनुकरणीय प्रवास नि कोटी कोटी शिवसैनिकांच्या मनी असलेले त्यांच्या साहेबांबद्दलचे प्रेम, आदर आणि निष्ठा गीतातून अधोरेखित होत असल्याचे दिसते.

शिवसेनेच्या आधी शिंदे गटाचं गाणं...
काल शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांनी आनंद शिंदे यांना घेऊन गाणे तयार करण्याची चर्चा सुरू असतानाच आज थेट गाणे लाँच करून दोन गटात सुरू असलेल्या टीझर वॉरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळालं. 'आम्ही शिवबाचे धारकरी, शिवसेनेचे मानकरी' अशा ओळी असलेले हे गाणे शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेनुसार 'प्रभारंग फिल्म्स् यांनी तयार केले असून आदर्श शिंदे यांनी ते गायले आहे.  

महत्वाच्या बातम्या

Dasara Melava 2022 : गुलाबराव पाटलांनी भाषणात 'तो' उल्लेख केला अन् एकनाथ शिंदे भावूक झाले... 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Embed widget