जनावरांप्रमाणे शंभराच्यावर लोकांचा एकाच वाहनातून धोकादायक प्रवास!
जनावरांप्रमाणे शंभराच्यावर लोक एकाच वाहनातून धोकादायक पद्धतीने प्रवास करत असल्याची घटना येडशी येथे उघडकीस आली. हे सर्व मजुर पुण्याहून बिहार, उत्तर प्रदेशमधील आपल्या गावाकडे जात होते.
उस्मानाबाद : लॉकडाऊनमुळे लाखो मजुरांचा घरी जाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. मिळेल त्या वाहनाने असंख्य मजुर गावाकडे निघाले आहेत. ज्यांना काहीचं वाहन मिळाले नाही त्यांनी पायीच घरची वाट धरली आहे. मात्र, जे वाहनातून प्रवास करतायेत त्यांचाही प्रवास काही सुखाचा नाही. जनावरांसारखे त्यांनाही कोंबून नेले जात आहे. अशीच एक घटना उघडकीस आली. जनावरांप्रमाणे माणसांनाही एकाच वाहनात धोकादायक पध्दतीने अन् तेही एक दोन नव्हे तर 104 जणांना दाटीवाटीने बसवून नेले जात होते.
हा टेम्पो पुण्याहून बिहारकडे जात असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी या ठिकाणी चेक नाक्यावर पकडण्यात आला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना उघड झाली आहे. पटेल नामक प्रवासी वाहतूक एजंटच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाकडून तीन हजार रूपये घेवून बिहारच्या मजुरांना घेवून एक टॅम्पो निघाला होता. तो पोलिसांनी पकडून ठेवला. पुण्याहून लेकराबाळांसह निघालेले शंभराहून अधिक प्रवासी हे बिहार उत्तरप्रदेशकडे आपल्या स्वगृही निघालेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेला वैद्यकिय तपासणीचे प्रमाणपत्र, ना प्रवासाचा परवाना, तरीही त्यांचा हा प्रवास सुरू होता. जास्त रहदारी नसलेल्या आणि कोणी अडविणार नाही अशा मार्गावरून जाण्याचा त्यांचा मानस होता. त्यामुळे त्यांनी हा मार्ग निवडला असल्याचे दिसून येत आहे.
झोन निश्चित करण्याचं स्वातंत्र्य राज्य सरकारांना मिळावं; चौथ्या लॉकडाऊनआधी राज्याची केंद्राकडे मागणी
पुण्याहून बिहार, उत्तर प्रदेशकडे प्रवास
पुण्याहून निघालेला टेम्पो बार्शीमार्गे येडशीपर्यंत पोहोचला. परंतु, तेथील चेकपोस्टवर त्यांना अडविण्यात आले. त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत परवानगीचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना कायदेशीर मार्गाचा सल्ला दिल्यानंतरही वाहन चालकाने तिथून वाहन उलट दिशेने माघारी वळवले. बार्शीतील बाह्यवळण रस्त्यावर आल्यानंतर त्यांनी काही तरी खाण्यापिण्याची सोय होईल का याचा शोध सुरू करून पेट्रोलपंपाजवळ वाहन थांबवले. महामारीच्या संकटाच्या काळात एकाच वाहनात मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करत असल्याचे दिसल्याने, यात काहीतरी काळेबेरे असावे असा संशय आल्याने, बार्शीतील सजग नागरिकाने तात्काळ हालचाल सुरू केली. या ना त्या मार्गाने ही माहिती पोलिसांपर्यंत कळविली. त्यानंतर पोलिसांनी तिथे येवून भयभीत मजूरांना धीर दिला. परंतु, आजही वाहनांतून सुरू असलेली ही भयंकर वाहतूक पुन्हा एकदा समोर आली.
Sindhudurg Migrants | मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांची मोठी गर्दी,खारेपाटण चेकपोस्टवर वाहनांच्या रांगा