पाणीसंकट! राज्यातील धरणांमध्ये 64 टक्के पाणीसाठा, कोणत्या विभागात किती पाणीसाठा शिल्लक?
राज्यातील धरणांमध्ये 64 टक्के पाणीसाठा (Dams Water Storage) असल्याची माहिती आकडेवारीवरुन समोर आली आहे. यामध्ये मराठवाड्यातील (Marathwada) धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा आहे.
Dams Water Storage : राज्यातील धरणांमध्ये 64 टक्के पाणीसाठा (Dams Water Storage) असल्याची माहिती आकडेवारीवरुन समोर आली आहे. यामध्ये मराठवाड्यातील (Marathwada) धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती विभागातील धरणांमध्ये पाणीसाठा कमीच असल्याचे समोर आलं आहे. औरंगाबाद विभागातील (Aurangabad Division) धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजे 37 टक्के पाणीसाठा आहे.
कोणत्या विभागातील धरणांमध्ये किती पाणीसाठी शिल्लक
पुणे विभागातील धरणांमध्ये 67 टक्के पाणीसाठा शिल्लक
नाशिक विभागातील धरणांमध्ये 68 टक्के पाणीसाठी शिल्लक
अमरावती विभागातील धरणांमध्ये 74 टक्के पाणीसाठी शिल्लक
नागपूर विभागातील धरणांमध्ये 69 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.
कोकण विभागातील धरणांमध्ये 79 टक्के पाणीसाठा
औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजे 37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे
सर्वात जास्त पाणीसाठी कोकण विभागात तर कमी मराठवाडा विभागात
मिळालेल्या आकडेवारीवरुन कोकण विभागातीलधरणांमध्ये सर्वाधिक पाणीसाठा शिल्लक आहे. कोकण विभागातील धरणांमध्ये 79 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर सर्वात कमी पाणीसाठी हा औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये आहे. औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये फक्त 37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं मराठवाड्यातील पाणीप्रश्न गभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये 85 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी मात्र, 64 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
कोयनेच्या पाण्यावरून जुंपली, सांगलीला पाणी सोडू नये यासाठी शंभुराज देसाईंचा दबाव, संजयकाका पाटलांचा आरोप