एक्स्प्लोर

कोरेगाव भीमामध्ये लाखोंची गर्दी, सुरक्षेची चोख व्यवस्था, इंटरनेट सेवा बंद

गेल्या वर्षी झालेल्या कोरेगाव-भीमा दंगलीचे पडसाद देशभरात उमटले होते. त्यामुळे यावर्षी अशी कोणती घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. जवळपास साडे सात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सु

पुणे : कोरेगाव भीमा जवळील ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी लाखो आंबेडकरी बांधव कोरेगाव भीमामध्ये आले आहेत. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या कोरेगाव-भीमा दंगलीचे पडसाद देशभरात उमटले होते. त्यामुळे यावर्षी अशी कोणती घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. जवळपास साडे सात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातील नागरिक सोमवारी रात्रीपासूनच पोहोचले आहेत. गेल्या वर्षीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली असून छुपे कॅमेरे, सीसीटीव्ही, ड्रोन यांच्या साहाय्याने परिसरावर नजर ठेवली जात आहे. कोरेगाव भीमा येथे गेल्या वर्षी झालेल्या दंगलीत करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. या दंगलीचे परिणाम देशभरात उमटले होते. त्यामुळे यंदा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. कोरेगाव-भीमामध्ये येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने चोख नियोजन केलं आहे. वाहतूक व्यवस्थेत बदल कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री अकरापासून वाहतूक वळवण्यात आली आहे. नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकणकडे वळवली आहेत. नगरकडून हडपसरकडे येणारी वाहने शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा-केडगाव चौफुला-सोलापूर महामार्गावरुन हडपसरकडे वळवली आहेत. पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहने चाकण मार्गे किंवा खराडी बाह्यवळण येथून नगरकडे वळवली आहेत. अशी आहे सुरक्षा व्यवस्था -  12 एसआरपीएफच्या तुकड्या - 1 हजार 200 होमगार्ड -  2 हजार समता सैनिक दलाचे स्वयंसेवक -   घातपात विरोधी पथक तैनात - जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्ट -  150 पीएमपीएमल आणि खासगी बसेस - 200 बलून्स -  300 मोबाईल टॉयलेट -  जड वाहनांची वाहतूक वळवली - पार्किंगसाठी 11 ठिकाणं - रस्त्यांवर बॅरिकेटिंग -   7 बीडीडीएस टीम्स -  40 व्हिडीओ कॅमेरे, 12 ड्रोन -  विजयस्तंभाच्या 7-8 किमी परिसरात 306 सीसीटीव्ही

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget