एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोटबंदीच्या निर्णयानंतर राज्यात काळ्या पैशाला ऊत, कोट्यवधी रुपये जप्त
मुंबई : मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात काळा पैसाही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात येत आहे. गेल्या 4 दिवसात विविध ठिकाणी छापे टाकून आयकर विभागानं मोठ्या रकमा जप्त केल्या आहेत. राज्यात गेल्या दोन-तीन दिवसात करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या रकमा जप्त करण्यात आल्या आहेत.
उस्मानाबादमध्ये 6 कोटी रुपये जप्ती
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरमध्ये आज 6 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. परभणीवरुन सांगलीच्या दिशेनं रोकड घेऊन जात असताना नगरपालिका निवडणुकीच्या भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
नागपुरात कोट्यवधी रुपयांच्या नोटा जप्त
नागपुर शहरात हिलटॉप परिसरात फ्लॅटमधून तब्बल 1 कोटी 87 लाख 50 हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. यामध्ये चलनातून बंद केलेल्या 500 आणि 1000च्या नोटा आहेत. या कारवाईत पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. अटक केलेल्या चार जणांपैकी एक जण स्वतःला चार्टर्ड अकाऊंटंट असल्याचं सांगत आहे.
सांगलीतही जुन्या नोटांची जप्ती
सांगलीतल्या विट्यामध्ये चारचाकी गाडीतून 22 लाख 85 हजारांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement