एक्स्प्लोर
Advertisement
मांजराला मारहाण, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाणांना कोर्टाची नोटीस
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी मांजराला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयाने नोटीस पाठवली असून, कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्त्वाचं म्हणजे तब्बल दोन वर्षांच्या खटल्यानंतर, न्यायालयाने वंदना चव्हाण यांना नोटीस पाठवून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
वंदना चव्हाण या पुण्यातील सदाशिव पेठेत यशोधन अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विजय नावडीकर यांनी सात- आठ मांजर पाळली आहेत. ती मांजरं सोसायटीतील कोणाच्याही घरात घुसतात.
वंदना चव्हाण यांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विश्रमाबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु बंदोबस्त झाला नाही. एक दिवस एक मांजर त्यांच्या घरात शिरलं असता, त्या मांजराला सळईने मारहान करण्यात आली. त्यामुळे नावडीकर चीडले.
मांजर अपंग झाल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात खटला दाखल केला. दोन वर्षे खटला चालवला. आता न्यायालयाकडून चव्हाणांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
वंदना चव्हाण, त्यांचे पती आणि घरातील इतरांविरुद्ध खटला सुरु आहे. मांजराला वंदना चव्हाण यांनी मारलं की त्यांच्या घरातील इतर कोणी, हे माहीत नाही, परंतु हा खटला संपूर्ण चव्हाण कुटुंबीयांविरोधात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement