Sanjay Raut : ईडीच्या कोठडीत संजय राऊतांना 'या' गोष्टींची मुभा
Sanjay Raut : संजय राऊत (Sanjay Raut) यांना न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत ईडीची (ED custody) कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस संजय राऊत यांचा मुक्काम ईडीच्या कोठडीत असरणार आहे.
मुंबई : शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत ईडीची (ED custody) कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढचे चार दिवस संजय राऊत यांचा मुक्काम ईडीच्या कोठडीत असणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत न्यायालयाने राऊत यांना घरचं जेवण आणि औषध देण्याची मुभा दिली आहे.
कोठडी सुनावताना न्यायालयाने संजय राऊत यांना कोठडीत घरचं जेवण आणि औषध देण्याची मुभा दिली आहे. याबरोबरच सकाळी आडेआठ ते साडेनऊ दरम्यान संजय राऊत यांना त्यांचे वकील भेटू शकतात. शिवाय रात्री साडेदहानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांना संजय राऊत यांची कोणत्याही प्रकारची चौकशी करता येणार नाही.
पत्रावालाचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना काल ईडीने ताब्यात घेतले आणि रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आली. राऊत यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कस्टडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता चार दिवसांत ईडीला संजय राऊत यांच्याविरोधात प्रबळ पुरावे गोळा करावे लागणाल आहेत.
संजय राऊत यांची आठ दिवसांची रिमांड मिळावी अशी मागणी ईडीने केली होती. तर संजय राऊत यांच्याकडे सर्व पैसा हा वैध मार्गांने आला आहे, त्यांच्यावर खोटी केस दाखल करण्यात आली आहे, तसेच संजय राऊत हे हर्ट पेशंट आहेत, त्यामुळे त्यांना कमी दिवसांची रिमांड द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलांनी केली होती.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांवर कारवाई केली आहे. आज सकाळी वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना ईडीच्या कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली. काल सकाळीच ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी दाखल झालं होतं. या पथकाने दिवसभर घरामध्ये राऊतांची चौकशी आणि छापेमारी केली. त्यानंतर सायंकाळी अधिकाऱ्यांनी राऊतांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं. या कार्यालयात सुमारे साडेसात तास राऊतांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री त्यांना अटक करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या