एक्स्प्लोर

Coronavirus : कोरोना संकटामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाली कोण?

Coronavirus :कोरोनात लोकप्रतिनिधींच्या कामाची ही प्राथमिकता बदललेली पाहायला मिळते. इतर देशात तंत्रज्ञानाचा वापर करून ही सर्व कामं पार पडत असतील तर भारतात असे का होत नाही? असा प्रश्नही समोर येतोय...

Coronavirus India : कोरोनाचा संसर्ग जसा वाढत चालला आहे. तसाच सर्वसामान्यांच्या लोकउपयोगी कामावरती परिणाम होताना पाहायला मिळत आहे . आपले प्रश्न मांडण्यासाठी मंत्रालयात प्रवेश नाही.  आवाज उठवण्याचे साधन अधिवेशन आहे, पण तिथेही अधिवेशनाचा कालावधी कमी कमी होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती चर्चा कमी होताना पाहायला मिळत आहे. त्यासोबतच लोकप्रतिनिधींच्या कामाची ही प्राथमिकता बदललेली पाहायला मिळते. इतर देशात तंत्रज्ञानाचा वापर करून ही सर्व कामं पार पडत असतील तर भारतात असे का होत नाही? असा प्रश्नही समोर येतोय...

 सध्या जगावरती कोरोनाच संकट आहे, याच संकटाचा सगळ्यात मोठा फटका देशात लोक उपयोगी कामावरती पडताना पाहायला मिळतोय. कारण सर्वसामान्यांच्या अडचणी या शासकीय कार्यालय आणि मंत्रालयात मांडल्या जातात. मात्र कोविडची आपत्ती आल्यापासून अनेकदा मंत्रालयातल्या भेटीगाठी बंद करण्यात आल्या आहेत. याहीपेक्षा सर्वाधिक प्रश्न राज्याच्या अधिवेशनामध्ये सोडवले जातात. मात्र काही दिवसांच अधिवेशन होत असल्याने तिथेही जनतेच्या प्रश्नावर चर्चा होताना पाहायला मिळत नाही. कोविड काळातील दोन वर्षातील अधिवेशनाचा कालावधी आणि झालेलं काम पाहिलं तर धक्कादायक निष्कर्श मिळालाय...

दोन वर्षातील  विधानसभा अधिवेशन कामकाज....
सन- 2020
अर्थसंकल्पी अधिवेशन- 
कामकाजाचे दिवस 14 
कामकाजाचे तास 92 तास नऊ मिनिटे 
संमत विधेयके 16

पावसाळी अधिवेशन
कामकाजाचे दिवस 2 
कामकाजाचे  तास नऊ तास तीस मिनिटे
 संमत विधेयक 12

हिवाळी अधिवेशन
कामकाजाचे दिवस- 2 दिवस
कामकाजाचे तास- पंधरा तास
संमत विधेयक 9

सन 2021
अर्थसंकल्पीय अधिवेशन
कामकाजाचे दिवस- 8 दिवस 
कामकाजाचे तास 42 तास 
संमत विधेयके- 6 

पावसाळी अधिवेशन 
कामकाजाचे दिवस 2 
कामकाजाचे तास 10 तास 40 मिनिट 
समंत विधेयके 9

हिवाळी अधिवेशन 
कामकाजाचा दिवस-5 दिवस 
कामकाजाचे तास 46 तास 20मिनिटं
संमत विधेयके 19

कोविड काळात अधिवेशनाचा कालावधी आणि कामकाज अत्यंत कमी तर आहेच, मात्र मागील दहा वर्षांचा कालावधी पाहिला तर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कामकाजाचे दिवस कमी होताना पाहायला मिळतात. त्यामध्ये सरासरी 25 दिवसांच्या आत कामकाज आहे. मात्र याला अपवाद इतर राज्य आहेत. केरळ 50 दिवस कर्नाटक आणि ओरिसा 30 ते 35 दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे सहाजिकच आहे, या कमी कालावधीत जनतेच्या प्रश्नावर कमी चर्चा झालेली पाहायला मिळतेय.

कोरोना काळात लोकप्रतिनिधींचा कामाचाही प्राधान्यक्रम बदललेला पाहायला मिळतोय. संपर्क या सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 75 टक्के आमदारांनी आरोग्य सेवेतील सुधारणांना प्राधान्य क्रम दिला आहे. त्यामुळे मतदार संघातील विकास कामे ठप्प झाल्याचे मत 91% आमदारांचे आहे. कोरोना काळात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता असल्याचे निरीक्षण 54% आमदारांनी नोंदविला आहे. त्यामुळे विधानसभेचे अधिवेशन किती महत्त्वाचा आहे हे यातुन स्पष्ट होतय....

कोविड काळात जगभरात सर्वच क्षेत्रातील कामाचे स्वरूप झपाट्याने बदललेला आहे. स्पेन,ब्राझील, नॉर्वे, फिनलंड या देशांच्या सरकारने दूरसंसद (रिमोट) भरविण्यासाठी कायद्यात बदल केलेत. ब्राझील, स्पेन, मालदीव यांच्या संसदेने काम करण्यासाठी अभिनव मार्ग शोधले. ब्राझीलने तर झूम पार्लमेंट भरवलं होतं. जर ब्राझील झूम पार्लमेंट भरवत असेल तर मग भारतातच या नव्या तंत्रज्ञानाचा वापर का होऊ शकत नाही. प्राथमिक वर्गातले विद्यार्थी शिक्षणाचे धडे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेत असतील तर शासकीय कामकाज असेल किंवा अधिवेशनाचा कालावधी असेल हा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे किंवा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने का पूर्ण होत नाही असा प्रश्‍न समोर येतोय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget