एक्स्प्लोर
Coronavirus LIVE UPDATES | औरंगाबादमध्ये 50 लाखांचं बनावट सॅनिटायझर जप्त,अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई

Background
- देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात, रुग्णांचा आकडा तब्बल ३१ वर, नागपूर, यवतमाळ, रायगड, पिंपरीमध्ये नवे रुग्ण आढळल्यानं खळबळ
- ग्रामपंचायत क्षेत्र सोडून राज्यातल्या सर्व शाळा आणि कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय, खासगी क्लासेस आणि मॉल्सही बंद ठेवण्याचे आदेश
- शक्य असल्यास लग्न आणि समारंभ पुढे ढकला, पुणे विभागीय आयुक्तांचं आवाहन, पुढील आदेशापर्यंत शासकीय, धार्मिक, व्यावसायिक कार्यक्रम रद्द करण्याचे सरकारचे निर्देश
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टात विनाकारण गर्दी करू नका, प्रभारी मुख्य न्यायमूर्तींचे आदेश
- इराणमधल्या 234 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान मध्यरात्री परतलं, तर इटलीतले भारतीय नागरिकही भारताच्या दिशेने, सर्वांना 14 दिवस देखरेखीखाली ठेवणार
22:10 PM (IST) • 15 Mar 2020
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 50 लाखांचं बनावट सॅनिटायझर जप्त, सॅनिटायझरची एक्सपायरी डेट आणि किंमत बदलून सुरू होता फसवणुकीचा प्रयत्न,वाळूज परिसरातील युरोलाईफ हेल्थ केअर कंपनीवर कारवाई
22:04 PM (IST) • 15 Mar 2020
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील भाविकांच्या दृष्टीने श्रद्धेचा असलेला अकलूज येथील सुफी संत हजरत राजबागसवार दर्ग्यातील उरुस रद्द करण्यात आला आहे. अकलूज येथे असलेल्या या दर्ग्याच्या उरुसासाठी हजारो भाविक चार दिवस अकलूज येथे येत असतात. या दर्ग्यात 1760 च्याही पूर्वीपासून हा उरुस केला जातो. कोरोनाच्या भीतीमुळे प्रशासनाने सर्व जत्रा उरुस आणि यात्रा बंद करण्याचे आदेश दिल्याने सर्व हिंदू मुस्लीम भाविकांनी एकत्र येत यंदाचा उरूस रद्द करण्याचा निर्णय घेत, तसं पत्र प्रशासनाला दिलं आहे. या उरुसात प्रवचन देण्यासाठी हैदराबाद येथून अहमद नक्षबंदी साहेब हे जेष्ठ मुस्लिम संत येणार होते मात्र आता हा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरवर्षी उरुसाच्या चार दिवसात चार ते पाच लाख भाविक येथे दर्शनाला येत असतात.
Load More
Tags :
Corona In Mumbai News In Marathi Today\'s News In Marathi Corona In Pune ABP Majha Latest Update Corona In Ahamadnagar Corona Latest News Corona Symptoms Marathi News Today Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
सोलापूर
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement























