एक्स्प्लोर

Coronavirus | थाटामाटात लग्नाचा हट्ट नडला, आईवडिलांसह भटजी, फोटोग्राफरला जेलची हवा

पोलिसांनी कोरोना संसर्गाबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याची उद्घोषणा करुन जमलेल्यांना परत जाण्यास सांगितले. यावेळी पोलिसांच्या सूचना डावलत त्यांच्या आदेशाला नकार देत लग्न लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बीड : कोरोना व्हायरससंदर्भात राज्य सरकार आणि प्रशासन आपल्या स्तरावरुन सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याला काही लोकं चांगला प्रतिसाद देत आहेत तर काहीजण या स्थितीत देखील नियम मोडत आहेत. बीडमध्ये जिल्हाधिकारी यांनी दिलेला यांचा जमावबंदी आदेश डावलत नातेवाईकांना जमवून लग्न लावणाऱ्या भटजी, आई वडील नातेवाईक, फोटोग्राफरसह आठ जणांना आज काही काळ पोलीस कोठडीची हवा खावी लागली. ही घटना बीड जिल्हयातील माजलगाव शहरात जवळील ब्रम्हगाव येथे घडली. गाजावाजा करून धूमधडाक्यात लग्न करण्याचा हट्ट या मंडळींना नडला असून कायदा मोडला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. माजलगाव शहरापासून एक किमी अंतर असलेल्या ब्रम्हगाव येथे दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास लग्नासाठी जमाव जमला असल्याची माहिती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाली. यावरून त्यांनी शहर पोलिसांना लग्नस्थळी जाण्यास सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस ताफा घेवून लग्नस्थळी गेले असता यावेळी पोलिसांना लग्नस्थळी 100 ते 125 लोकं जमल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी कोरोना संसर्गाबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याची उद्घोषणा करुन जमलेल्यांना परत जाण्यास सांगितले. यावेळी पोलिसांच्या सूचना डावलत त्यांच्या आदेशाला नकार देत लग्न लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे पोलिसांनी लग्न लावण्यास आलेले भटजी, फोटोग्राफरसह आठ जणांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. यानंतर 5 ते 6 नातेवाईकांनी लग्न उरकून घेतले. Coronavirus | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 49, दोघे व्हेंटिलेटरवर : राजेश टोपे   महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 49 वर पोहोचली असून मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयातील दोघे व्हेंटिलेटरवर आहेत. तर इतरांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या 12 तासात 7 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लंडनमधून आलेली मुंबईतील महिला आणि दुबईहून परतलेले अहमदनगरमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. 49 पैकी 40 कोरोनाबाधित हे बाहेरच्या देशातून आलेले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण कमी असलं तरी याचा धोका वाढला आहे. त्यामुळे जनतेने राज्य सरकारने दिलेल्या सूचनाचं पालन करावं, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग टाळता येईल, असंही राजेश टोपे म्हणाले. आज आपण फेज 2 मध्ये आहोत, 3 मध्ये आपल्याला जायचं नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. मुंबई लोकल ट्रेनमध्ये गर्दी असते. तिथे संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. ट्रेन बंद करणं हा शेवटचा पर्याय असेल. सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहे, असं टोपे यांनी सांगितलं. तसंच एसटी बसमध्ये 50 ऐवजी 25 प्रवासी बसवले जाणार असून एका सीटवर एकच व्यक्ती असेल, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या पुणे - 19 मुंबई - 11 नागपूर - 4 यवतमाळ - 3 कल्याण - 3 नवी मुंबई - 3 रायगड - 1 ठाणे - 1 अहमदनगर - 2 औरंगाबाद - 1 रत्नागिरी- 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget