India Lockdown | रेल्वे रुळावरून पायी प्रवास करणाऱ्या 26 जणांवर कारवाई; रत्नागिरीच्या दिवाणखवटी नजिकची घटना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्ह्याच्या सर्वच सिमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईहून गावी जाण्याचे परतीचे सारे दोर कापण्यात आल्याने गाव परतण्याची चिंता त्यांना सतावत आहे.

रत्नागिरी : कोरोनाच्या भीतीसह लॉकडाऊनमुळे सारेच ठप्प असल्याने मुंबईस्थित चाकरमानी पुरते हवालदिल झाले आहेत. कामधंदा नसल्याने आणि पैसाअडका ही संपल्याने चाकरमानी चिंतेच्या गर्तेत अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील गिरगाव, दिवा येथे वास्तव्य असलेले 26 जण स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे रूळावरून पायी प्रवास प्रवास करीत गावी निघाले होते. ही बाब प्रशासनाला कळताच बुधवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील दिवाण खवटी नजिक सर्वांना प्रशासनाने रोखले. यासर्वांना गोळीबार मैदानातील बंदिस्त क्रीडांगणातील विलगीकरण कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्ह्याच्या सर्वच सिमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईहून गावी जाण्याचे परतीचे सारे दोर कापण्यात आल्याने गाव परतण्याची चिंता त्यांना सतावत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या जात असताना त्यांच्याकडे कानाडोळा करत गाव गाठण्यासाठी काही चाकरमानी नव्या युक्त्यांचा अवलंब करत आहेत. काही जण पोलिसांना चकवा देत गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पोलिसांच्या नाकाबंदी त्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
पाहा व्हिडीओ : पंतप्रधान मोदींचा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद
मुंबई येथील गिरगाव, दिवा येथील 26 चाकरमानी रेल्वे रूळावरून पायी प्रवास करत मुंबईतून रत्नागिरीच्या दिशेने निघाले होते. तीन दिवसापासून हे चाकरमानी जीवाची पर्वा न करता पायी प्रवासाला निघाले होते. मात्र येथील प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब येताच तातडीने सर्वांना रोखून ताब्यात घेण्यात आले. यामध्ये महिलांचाही समावेश असून हे चाकरमानी रत्नागिरी व संगमेश्वर येथील आहेत. या सर्वांना बंदिस्त क्रिडांगणातील विलगीकरण कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. कामधंदा नसल्याने उपासमार होत असून यामुळे पायी प्रवास करत गावी निघालो असल्याचे चाकरमान्यांनी सांगितले. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
आंबेडकर जयंती आणि शब-ए-बारातबाबत शरद पवार यांचं आवाहनCoronavirus | लॉकडाऊनमुळे पुणे, ठाण्यासह अनेक शहरांच्या हवेची गुणवत्ता सुधारली
Azim Premji | अझीम प्रेमजींची दरियादिली, 1125 कोटींची मदत करणार























