राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत काय होणार, येत्या काळात राज्यात कडक लॉकडाऊन?
राज्यात सक्तीचा लॉकडाऊन लावायचा, की 'ब्रेक दि चेन' या मोहिमेअंतर्गत निर्बंध आणखी कडक करायचे यासंबंधी चर्चा करत वाढता कोरोना संसर्ग आटोक्याच आणण्यासाठीच्या मार्गांबाबच चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुपारी राज्य मंत्रीमंडळाची एक बैठक पार पडणार आहे.
![राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत काय होणार, येत्या काळात राज्यात कडक लॉकडाऊन? Coronavirus Lockdown might imposed or strict rules be enforced in the state in the near future राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत काय होणार, येत्या काळात राज्यात कडक लॉकडाऊन?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/20/5bc4b998f34c03868063b1528de2219f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात सक्तीचा लॉकडाऊन लावायचा, की 'ब्रेक दि चेन' या मोहिमेअंतर्गत निर्बंध आणखी कडक करायचे यासंबंधी चर्चा करत वाढता कोरोना संसर्ग आटोक्याच आणण्यासाठीच्या मार्गांबाबच चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुपारी राज्य मंत्रीमंडळाची एक बैठक पार पडणार आहे. राज्यभरात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्यामुळं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबतची नाराजी व्यत्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय इतरही अनेक मंत्र्यांनी लॉकडाऊनचाच सूर आळवला आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा पक्षांतील मंत्र्यांनी कडक लॉ़कडाऊनचाच सूर आळवत सध्या निर्बंधांचं पालन होण्यात हयगय दिसून येत असल्याची बाब अधोरेखित केली. सध्या आरोग्य यंत्रणांवर कमालीचा ताण आहे. ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि इतरही आरोग्य सुविधांसाठी कमालीची धावपळ सुरु आहे. त्यातच आता या यंत्रणेवर आणखी ताण पडला तर ती कोलमडून जाईल हा मुद्दा मंत्र्यांनीही उचलून धरला आहे. ज्यानंतर, लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना उत्तरं द्यावी लागणार आहेत, परिणामी त्यांनी लॉकडाऊनचा सूर आळवला आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानं खुली ठेवण्यासाठीच्या वेळा निर्धारित करत त्या माध्यमातून विनाकारण घराबाहेर येणाऱ्यांची संख्य कमी करता येऊ शकते महा मुद्दा बैठकीत चर्चेत उपस्थित केला जाऊ शकतो. किंबहुना बहुतांश ठिकाणी वेळेची ही मर्यादा लागूही करण्यात आलेली आहे. पण, असं असलं तरीही लोकल ट्रेन, बस मात्र सुरु आहे. सार्वजनिक वाहतूक बंद केल्यास सर्वसामान्यांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतं. त्यामुळे नेमके कसे नियम राबवले जातात, ही आव्हानं सरकारपुढे आहेत.
दिल्लीपेक्षाही कडक लॉकडाऊन महाराष्ट्रात असल्याची प्रशासनाची भूमिका आहे, पण आता या साऱ्या मतांमध्ये समन्वय साधत कोणता निर्णय घेतला जाऊ शकतो याचीच चर्चा आज होणाऱ्या बैठकीत होऊ शकते.
राज्यात कोणते नवे निर्बंध लागू होण्याची शक्यता ?
- किराणा दुकानं 7 ते 11 वाजेपर्यंत खुली राहणार
- भाजी मार्केटसाठी वेळेचे निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता
- रस्तेमार्गानं आंतरजिल्हा वाहतुकीसाठी नियमावली
- रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाईची शक्यता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)