एक्स्प्लोर
Advertisement
Coronavirus UPDATES | खासगी कार्यालयांमध्ये 'वर्क फ्रॉम होम' बंधनकारक, राज्य सरकारचे आदेश
LIVE
Background
पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16 वर पोहोचली आहे, तर राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांंचा आकडा 33 वर पोहोचला आहे. देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 107 वर पोहोचला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही जमावबंदी लागू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव दिल्याची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी माहिती दिली आहे.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या 36 वर
- पुणे - 16
- मुंबई - 5
- ठाणे - 1
- कल्याण- 1
- नवी मुंबई - 1
- पनवेल - 1
- नागपूर - 4
- अहमदनगर - 1
- यवतमाळ -2
- औरंगाबाद - 1
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 107 वर
- महाराष्ट्र -33
- केरळ - 22
- पंजाब - 1
- दिल्ली - 7
- जम्मू कश्मीर - 2
- लडाख - 3
- राजस्थान - 4
- उत्तरप्रदेश - 11
- कर्नाटक - 6
- तामिळनाडू - 1
- तेलंगाना - 3
- हरयाणा - 14
- आंध्रप्रदेश - 1
22:51 PM (IST) • 16 Mar 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती गोळा करून संशयित रुग्णांची माहिती मिळवली जात आहे..
22:48 PM (IST) • 16 Mar 2020
एकीकडे कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातलेल्या असताना याचा फायदा घेत अनेकांनी स्वतःचे खिसे भरण्यास सुरुवात केली आहे. अशाच प्रकारे मुलुंडच्या आरआरटी रोड वर असलेल्या शीतल आयुर्वेदिक भांडारमध्ये चक्क कोरोना वर उपाय म्हणून गोळ्या मिळत असल्याची जाहिरात करण्यात आली होती. माती सारखी चव असणाऱ्या या गोळ्या दीडशे रुपयांना पाकीट अशा विकल्या जात होत्या.कोरोना झालेल्या व्यक्तीने दर दहा मिनिटाला गरम पाण्यासह एक गोळी घ्यावी यामुळे कोरोना बरा होतो असा दावा या आयुर्वेदिक भांडार तर्फे करण्यात येत होता.याची जाहिरात पॉप्लेट, भिंतीपत्रकाद्वारे करण्यात आली होती.या बाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती मिळताच त्यांनी मुलुंड पोलिसांच्या मदतीने या दुकानावर छापा मारली.या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणत अश्या प्रकारच्या गोळ्यांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.रात्री उशिरापर्यंत याबाबतची कारवाई सुरू आहे.
22:45 PM (IST) • 16 Mar 2020
भाजपच्या या आठवड्यातील दोन बैठका रद्द,
भाजपची विस्तारित कोअर कमिटीची बैठक रद्द,
उद्या 5 वाजता होती बैठक, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर उद्या शासकीय निवासस्थानी होती बैठक
,
दुसरी, 18 तारखेला नियोजित असलेली भाजप आमदार आणि खासदारांची बैठकही रद्द
,
आमदार आणि खासदारांसाठी सोशल मिडियाचं वर्कशॉप ठेवण्यात आलं होतं
,
दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात होते वर्कशॉपचे आयोजन
21:34 PM (IST) • 16 Mar 2020
मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागातील एक अधिकारी कोरोनाच्या टेस्टसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल, सदर अधिकाऱ्याचा भाऊ आणि वहिनी कोरोना बाधित असल्याचे रिपोर्ट आल्याने अधिकारी कस्तुरबा रुग्णालयात, मंत्रालयातील अधिकाऱ्याचा भाऊ आणि वहिनी नुकतंच अमेरिकेला जाऊन आले आहेत. त्यानंतर त्यांना खोकला आणि ताप झाल्याने कोरोनाची टेस्ट करण्यात आली.
त्यांच्या कोरोनाचे टेस्ट पॉझिटिव्ह आले. हे दोन्ही भाऊ एकाच इमारतीत राहतात, एकमेकांना भेटत राहतात. भावाचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मंत्रालयातील अधिकाऱ्याने तात्काळ आपल्या वरिष्ठांना कळवले आणि आज कस्तुरबा मध्ये या अधिकाऱ्याच्या टेस्ट झाल्या. रिपोर्ट्स अजून आलेले नाहीत.
20:48 PM (IST) • 16 Mar 2020
खासगी कार्यालयांमध्ये 'वर्क फ्रॉम होम' बंधनकारक, तर 50टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसावी, राज्य सरकारचे आदेश
Load More
Tags :
Marathi News Today Corona In Ahamadnagar Corona In Mumbai Corona In Pune Corona Latest News Corona Symptoms ABP Majha Latest Update Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement