coronavirus LIVE UPDATES | डहाणू तलासरी पुन्हा भूकंपाने हादरले
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
LIVE
Background
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
राज्यात कालपासून 113 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 748 वर
आज राज्यात 113 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 748 झाली आहे. आज राज्यात 13 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 8 जण मुंबईतील, 3 जण पुण्याचे तर प्रत्येकी 1 रुग्ण कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबाद येथील आहे. कोरोनामुळेमुराज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 45 झाली आहे.
मृतांची माहिती
1. कस्तुरबा रुग्णालयात डोंबिवली येथील एका 67 वर्षीय महिलेचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. तिने परदेश प्रवास केलेला नव्हता. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते.
2. कस्तुरबा रुग्णालयात एका 64 वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.
3. नायर रुग्णालयात एका 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.
4. केईएम रुग्णालय 60 वर्षीय पुरुषाचा आज पहाटे मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.
5. कस्तुरबा रुग्णालयात एका 52 वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला उच्च रक्तदाब , मधुमेह या आजारासोबत तो एचआयव्ही बाधितही होता.
6. केईएम रुग्णालय मुंबई येथे एका 70 वर्षीय महिलेचा काल रात्री मृत्यू झाला. तिने परदेश प्रवास केलेला नव्हता. तिला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा आजार होता त्यामुळे ती डायलिसीसवर होती.
7. चेंबूर येथील एका खाजगी रुग्णालयात एका 55 वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केला नव्हता. तो टॅक्सी ड्रायव्हर असल्याने अनेकदा तो प्रवासी वाहतुकीसाठी विमानतळावर येत-जात असे.
8. कस्तुरबा रुग्णालयात एका 77 वर्षीय पुरुषाचा काल पहाटे मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.त्याला उच्च रक्तदाब , मधुमेह हे आजार होते.
9. चेंबूर येथील खाजगी रुग्णालयात 80 वर्षीय पुरुषाचा काल पहाटे मृत्यू झाला. या रुग्णाने परदेश प्रवास केलेला नव्हता. या रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब अशा व्याधी होत्या. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झालेला होता.
10. कोरोना बाधित रुग्णाची निकट सहवासित असलेल्या 60 वर्षीय महिलेचा काल मध्यरात्री पुण्याच्या ससून रुग्णालयात मृत्यू झाला. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजारही होते.
11. पुण्याच्या ससून रुग्णालयात 52 वर्षाच्या एका पुरुषाचा मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नाही. त्याला मधुमेहाचा त्रास होता.
12. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज एका 58 वर्षाच्या बॅंक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा त्रास होता. नजीकच्या काळात मुंबई वगळता त्यांनी कोठेही प्रवास केलेला नव्हता.
13. जिल्हा रुग्णालय औंध पुणे येथे आज दुपारी एका 77 वर्षीय आत्यंतिक स्थूल असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. तिची नुकतीच पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. शहरातील एका खाजगी रुग्णालयाने तिला संदर्भित केले होते.