एक्स्प्लोर

Coronavirus Maharashtra Live Updates | नाशिकमध्ये 4 नवे कोरोनाग्रस्त, जिल्हातील एकूण रुग्णांची संख्या 382 वर

Coronavirus in Maharashtra Live : राज्यात रविवारी (3 मे) कोरोनाच्या 678 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 12,974 झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिलासादायक बाब म्हणजे काल 115 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आतापर्यंत एकूण 2115 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, काल दिवसभरात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुणे ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

LIVE

Coronavirus Maharashtra Live Updates | नाशिकमध्ये 4 नवे कोरोनाग्रस्त, जिल्हातील एकूण रुग्णांची संख्या 382 वर

Background

Coronavirus in Maharashtra Live Updates: राज्यात रविवारी (3 मे) कोरोनाच्या 678 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 12,974 झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिलासादायक बाब म्हणजे काल 115 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आतापर्यंत एकूण 2115 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, काल दिवसभरात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात पाठविण्यात आलेल्या 1 लाख 70 हजार 139 नमुन्यांपैकी 1 लाख 56 हजार 078 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 12 हजार 974 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 81 हजार 382 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 158 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

नागपुरातून 1200 मजुरांना घेऊन विशेष 'श्रमिक' एक्स्प्रेस उत्तर प्रदेशला रवाना

राज्यात काल 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण संख्या 548 झाली आहे. या मृत्यूपैकी मुंबईमधील 21, पुण्यातील 4 आणि नवी मुंबईतील एक आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी 16 पुरुष तर 11 महिला आहेत. 27 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 14 रुग्ण आहेत. तर 10 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर तीनजण 40 वर्षांखालील आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 8800 (343)
ठाणे: 60 (२) 
ठाणे मनपा: 488 (७)
नवी मुंबई मनपा: 216 (4)
कल्याण डोंबिवली मनपा: 212 (3)
उल्हासनगर मनपा: 4
भिवंडी निजामपूर मनपा: 21 (1)
मीरा भाईंदर मनपा: 141 (2)
पालघर: 44 (1)
वसई विरार मनपा: 152 (3)
रायगड: 30 (1)
पनवेल मनपा: 55 (2)
नाशिक: 12
नाशिक मनपा: 43
मालेगाव मनपा: 229 (12)
अहमदनगर: 27 (2)
अहमदनगर मनपा: 16
धुळे: 8 (2)
धुळे मनपा: 20 (1)
जळगाव: 34 (11)
जळगाव मनपा: 12 (1)
नंदूरबार: 12 (1)
नाशिक मंडळ एकूण: 413 (30)
पुणे: 81 (4)
पुणे मनपा: 1243 (99)
पिंपरी चिंचवड मनपा: 72 (3)
सोलापूर: 7
सोलापूर मनपा: 109 (6)
सातारा: 37 (2)
पुणे मंडळ एकूण: 1549 (114)
कोल्हापूर: 10
कोल्हापूर मनपा: 6
सांगली: 29
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: 3 (1)
रत्नागिरी: 11 (1)
कोल्हापूर मंडळ एकूण: 61 (3)
औरंगाबाद: 5
औरंगाबाद मनपा: 239 (8)
जालना: 8
हिंगोली: 42
परभणी: 1 (1)
परभणी मनपा: 2
औरंगाबाद मंडळ एकूण: 297 (10)
लातूर: 12 (1)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: 3 
बीड: 1
नांदेड: 0
नांदेड मनपा: 31
लातूर मंडळ एकूण: 47 (2)
अकोला: 12 (1)
अकोला मनपा: 50
अमरावती: 3 (1)
अमरावती मनपा: 31 (9)
यवतमाळ: 79
बुलढाणा: 21 (1)
वाशिम: 2
अकोला मंडळ एकूण: 198 (12)
नागपूर: 6
नागपूर मनपा: 146 (2)
वर्धा: 0
भंडारा: 1
गोंदिया: 0
चंद्रपूर: 0
चंद्रपूर मनपा: 4
गडचिरोली: 0
नागपूर मंडळ एकूण: 158 (2)
इतर राज्ये: 28 (4)
एकूण: 12974 (548)

(टीप - ही माहिती कोरोना पोर्टलवरील आय सी एम आरने दिलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे.)

21:52 PM (IST)  •  05 May 2020

नाशिक जिल्ह्यातील 5 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 4 नवीन रुग्ण असून एकाची दुसरी चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. नाशिक शहर, येवला, सटाणा, सिन्नर, मालेगांव मधील प्रत्येकी एक रुग्ण आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत रूग्णसंख्या 382 झाली असून त्यापैकी 25 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
21:49 PM (IST)  •  05 May 2020

नाशिक शहरातील एकूण 51 दारू दुकान मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन आणि साथरोग अधिनियम कायद्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सोशल डिस्टंन्सिंग, गर्दी न होता एकावेळी दुकानासमोर 5 नागरिक उभे राहतील अशी व्यवस्था करणं, अशा अनेक नियमांचे झाले उल्लंघन झालं आहे.
21:47 PM (IST)  •  05 May 2020

बीड जिल्ह्यात सकाळी सात ते साडे नऊपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात येते. तिसऱ्या टप्प्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अंशतः काही प्रमाणात सूट दिली आहे. दरम्यान कोरोना बाबत नागरिक अजूनही गंभीर नसल्याचं दिसून आलं. परळी शहरातील मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक तसेच बँका बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडल्याचं दिसून आलं. एरवी असलेल्या गर्दीपेक्षा आज अधिक वर्दळ पहायला मिळाली.
21:47 PM (IST)  •  05 May 2020

कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत काही नवे सामाजिक बदल स्वीकारण्याची वेळ आली आहे. कोरोना व्हायरसमुळे मार्च आणि एप्रिल या महिन्यात मिळून लग्नाच्या जवळपास 44 तिथी होत्या. या मुर्हुर्तावर बुकिंग करण्यात आलेले मंगल कार्यालय रद्द झाली आहेत. एका अंदाजानुसार महाराष्ट्र मधील सुमारे दोन लाखांहून अधिक लग्न पुढे ढकलण्यात आली आहेत. त्यामुळे मंगल कार्यालया बरोबरच लग्न ह्या सोहळ्याची निगडीत असलेले अनेक घटक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. आता ग्रीन झोनमध्ये आणि उर्वरित झोनमध्ये सुद्धा काही अटींसह राज्यसरकारनं लग्नाला परवानगी दिली आहे. त्यामुळे केवळ गोरज मुहूर्तावरतीच लग्न, धुमधडाक्यात लग्न या गोष्टी टाळून नव्या सामाजिक बदलांमध्ये आपल्या सोयीच्या तारखांना लग्नाचा योग जुळून आणणं शक्य आहे का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
19:58 PM (IST)  •  05 May 2020

पिंपरी-चिंचवडमध्ये कंटेन्मेंट झोन सोडून शहरात वृत्तपत्र वितरणाला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. घरोघरी वितरण सकाळी 7 ते 10 या दरम्यान करावे, तसेच यासाठी वृत्तपत्र घेणाऱ्याची संमती असावी , वृत्तपत्र वितरण करणाऱ्याने मास्क घालावा, सॅनिटायझर वापरावा , सोसायटीने घरी वितरणाला परवानगी दिली नाही, तर सोसायटीच्या कार्यालयात वितरण करावे. अशा नियमांचे पालन करत वृत्तपत्र वितरणाला परवानगी देण्यात आली आहे.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget