एक्स्प्लोर

Coronavirus In Maharashtra : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चिंता वाढवणारी बातमी; राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, दिवसभरात 131 रुग्ण आढळले

Coronavirus Updates : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रविवारी, 31 डिसेंबर रोजी 131 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.

Coronavirus In Maharashtra :  नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून  कोरोनाबाधितांच्या संख्येत (Coronavirus Cases) वाढ होत आहे. आजही रविवारी, 31 डिसेंबर रोजी राज्यात 131 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus Infected) आढळले आहेत. त्यामुळे आता राज्यात सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 701 वर पोहचला आहे. तर, कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन.1 (Coronavirus JN.1 Infection) बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. या व्हेरिएंटचे 29 रुग्ण झाले आहेत. 

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण ठाण्यात आहेत. ठाण्यात कोरोनाचे 190 रुग्ण आढळले आहेत, तर मुंबईत आतापर्यंत 137 आणि पुण्यात 126 रुग्णांची पुष्टी झाली आहे. पुण्यात जेएन. 1 व्हेरिएंटचे सर्वाधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. सध्या पुण्यात 15 जेएन. 1 बाधितांची नोंद करण्यात आली आहे.  

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महाराष्ट्रात एक नवीन टास्क फोर्स देखील तयार करण्यात आला आहे, ज्याचे नेतृत्व ICMR चे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर करत आहेत. या टास्क फोर्समध्ये सात सदस्य आहेत. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

देशात 841 नवीन कोरोनाबाधितांची नोंद 

महाराष्ट्रात  कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना देशात रविवारी, 31 डिसेंबर रोजी  841 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. मागील सात महिन्यात एकाच दिवसात आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची हा सर्वोच्च आकडा आहे. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार,  या वर्षी 19 मे पासून देशात एकाच दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची नोंद झालेली ही सर्वाधिक संख्या आहे. यापूर्वी, 19 मे 2023 रोजी देशात संसर्गाची 865 नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. अलिकडच्या काही दिवसांत थंडी आणि कोरोना विषाणूच्या नवीन स्वरूपामुळे संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी, 5 डिसेंबरपर्यंत दैनंदिन प्रकरणांची संख्या दुहेरी आकड्यांवर आली होती.

बिहारमध्ये कोरोनामुळे 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

 बिहारमधील (Bihar) सासाराममध्ये कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असलेल्या 10 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  सासारामचे सिव्हिल सर्जन डॉ. केएन तिवारी यांनी मुलीच्या मृत्यूविषयी माहिती दिली. बिहारमधील  लिलारी, नोखा येथे राहणारी ही मुलगी होती. या मुलीवर देहरीच्या जमुहर येथील नारायण मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

मुलगी गयाच्या शेरघाटी येथे एका नातेवाईकाला भेटायला गेली होती. तिथेच तिची तब्येत बिघडू लागली आणि त्यानंतर तिला जमुहरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणी केली असता तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Praful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget