एक्स्प्लोर
Advertisement
आईच्या उत्तरकार्याचा खर्च टाळून धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत!
धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशींच्या या कृतीने त्यांच्यातील सामाजिक जाणिव दिसून आली असुन सोशल मीडियावर त्यांचे कौतुक केले जात आहे.
बीड : राज्यात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती आणि संस्थानी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांनी देखील आपल्या आईच्या उत्तरकार्याचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस केली मदत केली आहे.
प्रशांत जोशी यांच्या मातोश्री इंदूबाई भास्करराव जोशी यांचं 2 एप्रिल रोजी निधन झालं. प्रशांत जोशी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्तरकार्याचा खर्च टाळून त्याची रक्कम 25 हजार रुपये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊन एक आदर्श पायंडा पाडला आहे. प्रशांत जोशी यांनी 25 हजारांचा चेक मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द केला आहे. तसेच कोरोना विरुद्धच्या लढ्याला जिंकण्याची शक्ती देण्याची प्रार्थना यावेळी केली आहे.
प्रशांत जोशी यांच्या मातोश्रींचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले होते. गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सेवेत प्रशांत जोशी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या कार्यासाठी प्रशांत जोशी यांनी आईच्या निधनानंतर दोनच दिवसात 'बॅक टू वर्क' भूमिका घेत घरातूनच पूर्ण वेळ काम सुरू ठेवले आहे.
कोरोनाच्या लढ्यात समाजातील प्रत्येक घटक आपापल्या परीने वेगवेगळ्या स्वरूपात आपले योगदान देत आहे. याच पार्श्वभूमीवर आईच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, प्रशांत जोशींनी आपल्या आईच्या उत्तरकार्याचा विधी घरच्या घरी करत त्यांचा खर्च टाळून तो निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देऊन एक नवा पायंडा पाडला आहे. जोशींच्या या कृतीने त्यांच्यातील सामंजस्य आणि सामाजिक जाणिव दिसून आली असुन सोशल मीडियावर त्यांचे कौतुक केले जात आहे.
VIDEO | पिगीबॅंक फोडत चिमुरड्यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत! माझं गाव माझा जिल्हा
मुख्यमंत्र्यांकडून मदतीसाठी आवाहन
कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोविड-19 (COVID- 19 ) या नव्या खात्याती निर्मिती करण्यात आली आहे. या खात्यात स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मदत करण्यासाठी खात्याची सविस्तर माहिती
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement