LIVE UPDATES | राधानगरी धरणाचा पुन्हा एक स्वयंचलित दरवाजा उघडला
डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला सात वर्षे पूर्ण, सीबीआयच्या तपासावर कुटुंबियांची नाराजी दिलासादायक! कोरोना रुग्ण बरे होण्यात ठाणे शहर देशात दुसऱ्या, तर राज्यात पहिल्या क्रमांकावर सरकारी नोकरींसाठी आता देशभरात एकच सामायिक परीक्षा होणार! मोदी सरकारचा निर्णय कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
कोरोना काळात कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढवलं पाहिजे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना
राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळतील यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तालुकास्तरावर रुग्णवाहिका उपलब्ध राहतील याकडे जिल्हाधिकऱ्यांनी लक्ष घालावे. लवकर निदानासाठी काही जिल्ह्यांमध्ये कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. चाचण्यांची क्षमता पुरेशी असून त्याचा पूर्णपणे वापर करण्याचे आवाहन आरोग्मंत्र्यांनी केले. कोरोना काळात ट्रेसिंग वाढवलं पाहिजे अशा सूचना काही जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत. एक कोरोन बाधित रुग्ण संबंधित कमीत कमी 15 लोकांचे ट्रेसिंग केले पाहिजे, या राज्य सरकारच्या सूचना आहेत. मात्र खालील जिल्ह्यात कमी ट्रेसिंग होत आहे.
मुंबईत कोरोनाच्या चाचण्या वाढवा, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
देशाचा मृत्यूदर 1.92 टक्क्यांवर आहे. मात्र, मुंबईतील ऑगस्टमधील 17 दिवसांत मुंबईचा मृत्यूदर 5.40 टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज आहे. ही मागणी करणारे आणखी एक पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, सातत्याने आग्रह करून सुद्धा मुंबईत चाचण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे कारण आता कळेनासे झाले आहे. मुंबईतील मृत्यूदर सातत्याने वाढत असल्यानेच पुन्हा एकदा आग्रह आहे की, मुंबईत चाचण्यांची संख्या तातडीने वाढविण्यात यावी. जुलै महिन्यात मुंबईमध्ये प्रतिदिन 6574 चाचण्या करण्यात आल्या आणि या महिन्याचा मृत्यूदर हा 4.91 टक्के इतका होता. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत प्रतिदिन 7009 चाचण्या करण्यात आल्या. या 17 दिवसांचा मृत्यूदर हा 5.40 टक्के इतका झाला आहे. मुंबईची एकूणच लोकसंख्या पाहता प्रतिदिन 7000 चाचण्या ही संख्या अतिशय कमी आहे. देशाचा मृत्यूदर आता 1.92 टक्क्यांवर आला आहे, असे असताना मुंबईचा मृत्यूदर सातत्याने 5 टक्क्यांच्या वर असणे हे अतिशय चिंताजनक आहे.
सांगलीतील पूर परिस्थिती रोखण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटीलांकडून कोयना धरणाची पाहणी
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीतील पाणी पातळी इशारा पातळी जवळ आली आहे. सध्या पाऊस ओसरला जरी असला तरी पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जर पुन्हा कोयना धरणातून विसर्ग वाढवला गेला तर सांगलीत पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोयना धरणाची पाहणी केली.