एक्स्प्लोर
Advertisement
Coronavirus | मुंबईत चौथा कोरोनाबाधित, अहमदनगरमध्येही एकाला लागण, राज्यात एकूण 19 रुग्ण
प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांसाठी आवश्यक असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा देखील सुरु राहतील.
मुंबई : भारतात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. दिल्लीतील 68 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही आज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. अहमदनगरमध्ये एका रूग्णाला कोरोनाची लागण झाली आहे, तर मुंबईतही आणखी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत आता 4, पुण्यात 10, नागपुरात 3 तर ठाण्यात एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आता राज्यात एकूण 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
मुंबईत आज चौथा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. दुबईहून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या हिंदुजा हॉस्पिटलमधील एका 63 वर्षीय व्यक्तीस काल कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते. त्याच व्यक्तिच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या एका नातेवाईकासही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
Coronavirus | कोरोना व्हायरसचा देशातला दुसरा बळी, दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा मृत्यू
दरम्यान, साथरोग प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनांसाठी आवश्यक असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे आणि बस या अत्यावश्यक सेवा देखील सुरु राहतील. तसेच महानगरांमधील मॉल्स आणि हॉटेल सुरु राहणार आहेत. मात्र, नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
दरम्यान, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कायदा लागू झाला म्हणजे राज्यभरात साथरोगाचा उद्रेक झाला असा अर्थ होत नाही, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रतिबंधात्मक उपायांसाठी राज्य शासन अशाप्रकारे कायदा लागू करुन आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे त्या माध्यमातून अंमलात आणू शकते. यामुळे नागरिकांनी भिती न बाळगता आवश्यक ती खबरदारी बाळगावी. सामूहिक कार्यक्रमांमध्ये गर्दी करणे टाळावे. मॉल्स, हॉटेल सुरु असले तरी तेथे जाणे टाळल्यास अनावश्यक गर्दी होणार नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्यामध्ये 133 संशयित रुग्ण भरती
राज्यामध्ये सध्या 133 संशयित रुग्ण भरती झाले असून 13 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 हजार 390 विमानांमधील 1 लाख 60 हजार 175 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. 18 जानेवारीपासून राज्यात सध्या वेगवेगळ्या विलगीकरण कक्षामध्ये एकूण 532 जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 441 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहे. त्यातील 17 जण पॉझिटिव्ह आहेत. सध्या पुणे येथे 18 जण, मुंबई येथे 35, नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 18 जण, यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 9 जण तर पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात 3 संशयित रुग्ण भरती करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत बाधित भागातून 818 प्रवासी आले आहेत.
संंबंधित बातम्या :
#CoronaVirus | कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार, शनिवारीच अधिवेशनाचा समारोपCoronavirus | पुण्यानंतर मुंबईत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण
Corona Virus | असंवेदनशीलतेचा कळस, कोरोना पीडित रुग्णाच्या कुटुंबाला वाळीत टाकलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement