एक्स्प्लोर

coronavirus | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा नऊ हजारावर, दिवसभरात 31 जणांचा मृत्यू

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9318 वर पोहोचली आहे. आज एका दिवसात कोरोना बाधितांचा आकडा 729 ने वाढला आहे. तर दिवसभरात 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईची रुग्ण संख्या सहा हजारावर गेली असून पुण्यात देखील कोरोनाबाधितांचा आकडा हजारावर गेला आहे.

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 729 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9318 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 25 जण मुंबईचे तर पुण्यातील 2 आणि जळगाव येथील प्रत्येकी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 400 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 106 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 29 हजार 931 नमुन्यांपैकी 1 लाख 20 हजार 136 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 9318 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 55 हजार 170 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 9917 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 1388 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 16 पुरूष तर 15 महिला आहेत. त्यातील 20 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 10 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण 40 वर्षांखालील आहे. 31 रुग्णांपैकी 20 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 9318 मृत्यू - 400 मुंबई महानगरपालिका- 6169 (मृत्यू 244) ठाणे- 45 (मृत्यू 2 ) ठाणे महानगरपालिका- 344 (मृत्यू 4) नवी मुंबई मनपा- 142(मृत्यू 3) कल्याण डोंबिवली- 153 (मृत्यू 3) उल्हासनगर मनपा - 3 भिवंडी, निजामपूर - 14 मिरा-भाईंदर- 123 (मृत्यू 2) पालघर- 41 (मृत्यू 1 ) वसई- विरार- 123(मृत्यू 3) रायगड- 22 पनवेल- 44 (मृत्यू 1) नाशिक - 5 नाशिक मनपा- 19 मालेगाव मनपा - 171 (मृत्यू 12) अहमदनगर- 26 (मृत्यू 2) अहमदनगर मनपा - 16 धुळे - 8 (मृत्यू 2) धुळे मनपा - 17 (मृत्यू 1) जळगाव- 30 (मृत्यू 8) जळगाव मनपा- 10 (मृत्यू 1) नंदुरबार - 11 (मृत्यू 1) पुणे- 58 (मृत्यू 3) पुणे मनपा- 1044 (मृत्यू 76) पिंपरी-चिंचवड मनपा- 72 (मृत्यू 3) सातारा- 32 (मृत्यू 2) सोलापूर- 7 सोलापूर मनपा- 75 (मृत्यू 5) कोल्हापूर- 7 कोल्हापूर मनपा- 5 सांगली- 26 सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 1 (मृत्यू 1) सिंधुदुर्ग- 1 रत्नागिरी- 8 (मृत्यू 1) औरंगाबाद -1 औरंगाबाद मनपा- 89 (मृत्यू 6) जालना- 2 हिंगोली- 15 परभणी मनपा- 1 लातूर -12 (मृत्यू 1) उस्मानाबाद-3 बीड - 1 नांदेड मनपा - 3 अकोला - 12 (मृत्यू 1) अकोला मनपा- 22 अमरावती- 2 अमरावती मनपा- 26 (मृत्यू 7) यवतमाळ- 71 बुलढाणा - 21 (मृत्यू 1) वाशिम - 1 नागपूर- 4 नागपूर मनपा - 131 (मृत्यू 1) भंडारा - 1 चंद्रपूर मनपा - 2 गोंदिया - 1

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 664 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 9061 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 38.30 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget