Coronavirus | राज्यात आज 431 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 5649 वर
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5619 वर पोहोचली आहे. आज एका दिवसात कोरोना बाधितांचा आकडा 431 ने वाढला आहे, तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 431 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5649 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 18 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 10 जण मुंबईचे तर पुण्याचे दोन तर दोन औरंगाबाद, कल्याण डोंबिवली, सोलापूर, जळगाव, मालेगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू आहे. राज्यात आतापर्यंत 269 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 90 हजार 223 नमुन्यांपैकी 83 हजार 979 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 5649 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 9 हजार 72 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 8051 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 300 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 14 पुरूष तर 4 महिला आहेत. त्यातील 5 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 12 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण 40 वर्षांखालील आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 18 रुग्णांपैकी 12 रूग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे आजार होते.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 5649
मृत्यू - 269
मुंबई महानगरपालिका- 3683 (मृत्यू 161)
ठाणे- 24 (मृत्यू )
ठाणे महानगरपालिका- 166 (मृत्यू 4)
नवी मुंबई मनपा- 101(मृत्यू 3)
कल्याण डोंबिवली- 97 (मृत्यू 3)
उल्हासनगर मनपा - 1
भिवंडी, निजामपूर - 7
मिरा-भाईंदर- 81 (मृत्यू 2)
पालघर- 19 (मृत्यू 1 )
वसई- विरार- 115 (मृत्यू 3)
रायगड- 16
पनवेल- 35 (मृत्यू 1)
नाशिक - 4
नाशिक मनपा- 7
मालेगाव मनपा - 94 (मृत्यू 9)
अहमदनगर- 21 (मृत्यू 2)
अहमदनगर मनपा - 8
धुळे -5 (मृत्यू 1)
धुळे मनपा - 4
जळगाव- 4 (मृत्यू 1)
जळगाव मनपा- 2 (मृत्यू 1)
नंदुरबार - 7
पुणे- 19 (मृत्यू 1)
पुणे मनपा- 734 (मृत्यू 54)
पिंपरी-चिंचवड मनपा- 52 (मृत्यू 2)
सातारा- 16 (मृत्यू 2)
सोलापूर मनपा- 30 (मृत्यू 3)
कोल्हापूर- 6
कोल्हापूर मनपा- 3
सांगली- 26
सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 1 (मृत्यू 1)
सिंधुदुर्ग- 1
रत्नागिरी- 8 (मृत्यू 1)
औरंगाबाद- 1
औरंगाबाद मनपा- 37 (मृत्यू 5)
जालना- 2
हिंगोली- 7
परभणी मनपा- 1
लातूर मनपा-8
उस्मानाबाद-3
बीड - 1
नांदेड मनपा - 1
अकोला - 11 (मृत्यू 1)
अकोला मनपा- 10
अमरावती मनपा- 7 (मृत्यू 1)
यवतमाळ- 18
बुलढाणा - 24 (मृत्यू 1)
वाशिम - 1
नागपूर- 3
नागपूर मनपा - 97 (मृत्यू 1)
चंद्रपूर मनपा - 2
गोंदिया - 1
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात एकूण 6798 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 25.61 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
संबंधित बातम्या :