भिवंडीत कोरोनाचे आणखी 4 नवे रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोबाधितांचा आकडा 10 वर
भिवंडीत शहरी भागात दोन आणि ग्रामीण भागात दोन असे चान नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या एकूण 10 वर पोहचली आहे.

भिंवडी : मुबंईतील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबत मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील भिवंडीतही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. भिवंडी शहरातील वेताळपाडा येथे दोन महिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले ग्रामीण भागातही दोन महिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भिवंडी शहरी भागात 5 तर ग्रामीण भागात 5 असे भिवंडीत कोरोना रुग्णांची संख्या एकूण 10 वर पोहचली आहे.
शहरातील वेताळपाडा येथे 53 वर्षीय व्यक्ती मालेगाव येथून भिवंडीत आली होती. या रुग्णाचे कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह आल्यानंतर या रुग्णास उपचारासाठी ठाणे सिव्हील रुग्णालयात पाठवले असल्याची माहिती आहे. या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना भिवंडी क्वॉरंटाईन केंद्रात पाठवण्यात आले होते. तसेच वेताळपाडा परिसर देखील महापालिका प्रशासनाने सील केला होता. दरम्यान आता या मालेगावहून आलेल्या व्यक्तीच्या घरातील त्याची 45 वर्षीय पत्नी व त्याची 23 वर्षीय सून अशा दोघी महिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती भिवंडी महापालिका प्रशासनाने दिली आहे.
तर दुसरीकडे भिवंडी ग्रामीण भागात कशेळी गावातील 57 वार्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. सदर व्यक्ती ठाणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत होती. या व्यक्तीच्या मुलीचा आणि सुनेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, तर पत्नीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट येणे बाकी आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच हजारच्या पुढे गेली आहे. आज दिवसभरात राज्यात 552 नवे कोरोना पॉझिटिव्हि रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 5218 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण 722 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
संबंधित बातम्या
- मुंबई- पुणे भागात लॉकडाऊनबाबतीत सवलती रद्द, वाढलेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
- Attack on Doctors | आयएमएचे डॉक्टर 23 एप्रिलला काळा दिवस पाळणार!
- मुंबईतील झोपडपट्ट्यांना बिल्डर, आर्किटेक्ट जबाबदार; रतन टाटा यांची टीका
- Coronavirus | राष्ट्रपती भवन परिसरात कोरोनाचा शिरकाव; 100 कुटुंब सेल्फ क्वॉरंन्टाईन























