Corona Vaccination For Children LIVE : मुलामुलींच्या लसीकरणाला सुरुवात, पाहा लाईव्ह अपडेट्स

Corona Vaccination For Children Latest updates : कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना देशात आजपासून लहान मुलांचं लसीकरण सुरु होणार आहे.

abp majha web teamLast Updated: 03 Jan 2022 12:59 PM

पार्श्वभूमी

Corona Vaccination For Children : देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना 3 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे, यासंदर्भातील घोषणा काही दिवसांनी पंतप्रधानांनी केली होती. यासाठी आधीपासून कोविन अ‍ॅपवर...More

पंढरपुरात लसीकरणासाठी आरोग्य विभाग थेट शाळेत पोहोचला, शहरातून सुरु न करता ग्रामीण भागात सुरु केल्याने विद्यार्थी हुडकण्याची वेळ 
ओमायक्रोनाचा धोका वाढू लागल्यानंतर पंतप्रधानांनी 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली आणि आजपासून देशभर या लसीकरणाला सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यात 16 केंद्रावरून ही लस दिली जात असताना पंढरपूर तालुक्यात मात्र एकमेव गादेगाव या ग्रामीण भागातील केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली आहे . शहरातून लसीकरण सुरु करणे आवश्यक असताना प्रशासनानं तालुक्यातील एक गाव निवडल्याने शहरातील अनेक मुले लसीकरणासाठी गादेगावकडे जाऊ लागली आहेत. मात्र गादेगावात एवढ्या संख्येने मुले लसीकरणाला यात नसल्याने आरोग्य विभागाने लसीकरणासाठी गावातील हायस्कुलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात केली. या ऐवजी या लसीकरणाची सुरुवात पंढरपूर शहरातून केली असती तर मोठ्या संख्येने मुलांचे लसीकरण करता आले असते. आता मात्र आरोग्य विभागाला लसीकरण करायला शाळातून मुले हुडकायची वेळ आली आहे .