(Source: ECI/ABP News/ABP Majha)
झारीतले शुक्राचार्य कोण आहेत?, ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पंकजा मुंडे यांची सरकारवर टीका
ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत, हे सर्व कामगार एकत्र असल्याने त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे त्यांची तपासणी करून सर्वांना सुरक्षितपणे घरी पाठवावे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
बीड : ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोहचवण्याच्या प्रश्नांवर पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत. कामगारांना घरी पोहचविण्याचा निर्णय जवळपास नक्की असताना विलंब होत असल्याने झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? असा सवाल करत कामगारांचा संयम सुटू देऊ नका, लवकर निर्णय घ्या असे ट्विट त्यांनी केले आहे.
राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे विविध ठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत, हे सर्व कामगार एकत्र असल्याने त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे त्यांची तपासणी करून सर्वांना सुरक्षितपणे घरी पाठवावे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
जे ठणठणीत आहेत ते ही आजारी पडतील 5000 ते 8000 लोक एका ठिकाणी आहेत एकदोन ठिकाणी पाऊस पडला त्यांना काही झालं तर कोण जवाबदार ?? Random टेस्ट करा हवं तर पण तात्काळ म्हणजे आज उद्याच निर्णय व्हावा ..ते जिल्ह्यात परतले तर गावा बाहेर isolated राहतील ..त्यांचे लेकरं आईबाप गावी एकटे आहेत
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 15, 2020
यासंदर्भात एक ट्विट करून त्यांनी 'ऊसतोड मजुरांचा निर्णय तात्काळ घ्या, त्यांचा संयम सुटू नये याची काळजी घ्या.ते एका ठिकाणी पंधरा दिवस आहेत. जे ठणठणीत आहेत ते ही आजारी पडतील पाच ते आठ हजार लोक एका ठिकाणी आहेत. आज एक दोन ठिकाणी पाऊस पडला त्यांना काही झालं तर कोण जबाबदारी घेणार? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला. 'ऊसतोड कामगारांच्या टेस्ट करा पण तात्काळ म्हणजे आज उद्याच निर्णय व्हावा, ते जिल्ह्यात परतले तर गावाबाहेर आयसोलेटेड राहतील. त्यांचे लेकरं आईबाप गावी एकटे आहेत', असे पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
एकही साधा शिंकला नाही मग काय चिंता आहे? त्यांना पाठवण्याचा निर्णय जवळपास नक्की असताना कोण झारीतले शुक्राचार्य??.आम्हाला श्रेय ही नको पण निर्णय करा, हा विषय राज्याच्या अधिकारात आहे.' असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या :
Maharashtra Lockdown | ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावी सोडण्याबाबत सरकारचा विचार