एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कंत्राटदार आत्महत्या प्रकरण : उद्योजक चंद्रकांत गव्हाणे यांना अटक
पैशांसाठी काही उद्योजक आपल्याला त्रास देत असल्याचा उल्लेख त्यांनी या चिठ्ठीत केला होता.
नांदेड : महावितरणचे कंत्राटदार सुमोहन कनगाला यांच्या आत्महत्येप्रकरणी नांदेड चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव चंद्रकांत गव्हाणे यांना अटक करण्यात आली आहे. सुमोहन कनगाला यांनी काल (11 जुलै) गोळी झाडत आत्महत्या केली होती. सुमोहन कनगाला यांनी आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही उद्योजकांच्या नावाचा समावेश होता. पैशांसाठी काही उद्योजक आपल्याला त्रास देत असल्याचा उल्लेख त्यांनी या चिठ्ठीत केला होता.
सुमोहन कनगाला यांनी चंद्रकांत गव्हाणे आणि आणखी तिघांसह एका कंपनीची स्थापना केली होती. पंरतु चंद्रकांत गव्हाणे यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करत कनगाला यांचे शेअर्स कमी दाखवले. त्यानंतर गव्हाणे 80 लाख रुपयांसाठी तर ओरिसातील आणखी एक पार्टनर 1 कोटी 20 लाखांसाठी त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी पत्रात लिहिलं होतं. अखेर परवाना असलेलं शस्त्र बँकेच्या लॉकरमधून काढून त्यांनी काल आत्महत्या केली.
ही चिठ्ठी पोलिसांनी सापडल्यानंतर चंद्रकांत गव्हाणे यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या संघटनेच्या सचिवालाच अटक झाल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement