एक्स्प्लोर

महावितरण कंपनीसह वीज वापरणारे ग्राहक होणार हायटेक, वाशिम जिल्ह्यात स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यास सुरुवात 

स्मार्ट मीटर बसण्याचा धडाका महावितरण कंपनीने सुरु केला आहे. अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यांना या स्मार्ट मीटरला लागण्यास सुरुवात होणार आहे, याची सुरुवात वाशिमपासून झाली आहे. 

Mahavitaran Electricity News : राज्यात गेल्या काही दिवसापासून स्मार्ट मीटर लागणार यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना मोठं नुकसान होणार आहे असं सांगितले जात होतं. मात्र, आता विरोधानंतरही स्मार्ट मीटर बसण्याचा धडाका महावितरण कंपनीने सुरु केला आहे. अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यांना या स्मार्ट मीटरला लागण्यास सुरुवात होणार आहे, याची सुरुवात वाशिमपासून झाली आहे. 

तंत्रज्ञान जसं प्रगत होत चालल आहे तसेच ग्राहक आणि वितरण करणारी कंपनी ही स्मार्ट होताना दिसत आहे. बदलत्या काळात बदल घडवून आणण्यासाठी राज्यात महावितरण कंपनीने आता स्मार्ट विद्युत मीटर बसवण्यास सुरवात केली आहे. याची सुरवात वाशिम जिल्ह्यात झाली आहे. पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांना एका खासगी कंपनीला कंत्राट मिळालं आहे. वाशिम जिल्हात 1 लाख 92 हजार  ग्राहकांना स्मार्ट मीटर बसलवल्या जाणार असून ऑक्टोबरच्या 15 तारखेनंतर काम सुरू झालं आहे.

वाशिम जिल्ह्यात साधारणता अडीच हजार घरात  स्मार्ट मीटर बसवण्यात आले

वाशिम जिल्ह्यात साधारणता अडीच हजार घरात  स्मार्ट मीटर बसवण्यात आलेली आहेत. या मोहिमेची विशेषतः  सुरुवात सरकारी कार्यालयापासून झालेली असून सर्वात प्रथम सरकारी कर्मचारी कार्यालय आणि सौरऊर्जे पासून चालणाऱ्या वीज निर्मिती उपकरणासाठी या मीटरचा वापर केला  गेला आहे. तर अद्यावत माहिती ग्राहकांना मिळावी या करिता  स्मार्ट मीटर तंत्रज्ञानच्या मदतीने वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक  युनिटचा हिशोब मोबाईल वर मॅसेज द्वारे मिळणार असून ग्राहकांच्या विज बिल बाबत असणाऱ्या तक्रारी आणि मीटर रिडींग असेल याबाबतच्या तक्रारीच निराकरण होणार आहे. मात्र हे सध्या प्रीपेड मीटर नसणार असल्याचं वीज वितरण कंपनीने सांगितलं आहे. 

विजेची चोरी करणाऱ्या ग्राहकांना चाप बसवण्यासाठी सरकारचा निर्णय

विजेची बिले थकवणाऱ्यांना आणि विजेची चोरी करणाऱ्या ग्राहकांना चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारने आता स्मार्ट मीटर योजना आणली आहे. त्याकरीता देशभरातील सर्व विजेची मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. सर्व विद्युत वितरण कंपन्यांना ही स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आता मोबाईल सिमकार्ड रिचार्ज प्रमाणे आधी प्रीपेड वीज मीटर धारकांना आधी आपल्या खात्यावर आगाऊ पैसे भरावे लागतील त्यानंतर त्यांनी वीज वापरता येणार आहे. म्हणजे त्यांना आता आपल्या गरजेप्रमाणे वीज मीटर रिचार्ज करता येणार आहे. त्यामुळे तुमचा जर रिचार्ज संपला तर वीज प्रवाह बंद केला जाणार आहे. त्यामुळे आता काळजीपूर्वक दर महिन्याला आधी रिचार्ज करावे लागणार आहे. अन्यथा डिश टीव्हीचे रिचार्ज संपल्यावर टीव्हीवरील सेवा बंद होते तशी घरातील बत्ती गुल होऊन तुम्हाला अंधारात बसावे लागणार आहे. यामुळे महावितरण किंवा बेस्ट, टाटा, अदानी अशा वीज पुरवठा कंपन्यांना आणि ग्राहकांना त्यांचा रोजचा वीज वापर कळण्यास मदत होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget