एक्स्प्लोर

दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांना काँग्रेस विधानपरिषदेवर पाठवणार, सूत्रांची माहिती

दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव (Pradnya Rajeev Satav) यांना काँग्रेस विधानपरिषदेवर (Congress)  पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नवी दिल्ली : दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव (Pradnya Rajeev Satav) यांना काँग्रेस विधानपरिषदेवर (Congress)  पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.  लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याची देखील माहिती आहे.  जुलै 2024 पर्यंत या विधानपरिषदेची मुदत आहे. जर या जागेवर निवड झाली तर राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नीकडे जाणार आहे. 

या रिक्त झालेल्या जागेसाठी चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे यांच्याही नावाची चर्चा सुरु होती.  एकाच जागेसाठी निवडणूक असल्याने महाविकासआघाडीसाठी ही निवडणूक फारशी अवघड नाही. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर विधानपरिषदेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. 29 नोव्हेंबरला विधानपरिषदेच्या या एका जागेसाठी निवडणूक अपेक्षित आहे. 16 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.

रणपिसेंच्या निधनानं रिक्त जागेवर काँग्रेस अनुसूचित समाजालाच प्राधान्य देणार?

शरद रणपिसे यांच्या रुपानं अनुसूचित जातीचं नेतृत्व काँग्रेसनं विधानपरिषदेत दिलं होतं. त्यामुळे ही जागा या समाजालाच मिळावी असा तर्क करत काँग्रेसमध्ये काही इच्छुक सरसावले आहेत. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर नुकतेच जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त झालेले जितेंद्र देहाडे हे इच्छुकांच्या शर्यतीत होते. विधानपरिषदेत रणपिसे काँग्रेसचे गटनेते म्हणून काम पाहत होते. त्यांच्या निधनानंतर परिषदेत अनुसूचित जातींचा एकही आमदार नाही, त्यामुळे ही जागा एससी समाजालाच मिळावी असा आग्रह काहींनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडे केल्याचं कळलं होतं.. 
 
त्याशिवाय काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावाचा विचार विधानपरिषदेसाठी होतो का याचीही उत्सुकता होती. राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठीही त्यांच्या नावाची चर्चा होती. पण राज्यसभा खासदारकी रजनीताई पाटील यांना देण्याचा निर्णय हायकमांडनं घेतला. त्यामुळे राज्यात विधानपरिषदेच्या माध्यमातून सातव कुटुंबाला भविष्यातल्या राजकारणासाठी ताकद दिली जाते का याचीही उत्सुकता होती. शेवटी प्रज्ञा सातव यांनाच संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे.  या एका जागेची निवड आमदारांमधून होणार असल्यानं आणि महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यानं काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. शरद रणपिसे यांच्या निधनानंतरची उर्वरित चार वर्षांची टर्म म्हणजे  27 जुलै 2024 पर्यंतची टर्म नव्यानं निवडून आलेल्या आमदारास मिळणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : सलग चौथ्या दिवशी पुणे गोळीबारनं हादरलं; जुन्या वादाचा राग मनात धरून झाडल्या थेट तीन गोळ्या
Pune Crime News : सलग चौथ्या दिवशी पुणे गोळीबारनं हादरलं; जुन्या वादाचा राग मनात धरून झाडल्या थेट तीन गोळ्या
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
Divyanka Tripathi : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया; आता प्रकृती कशी?
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया; आता प्रकृती कशी?
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nagpur Textile Theme polling Booth : नागपुरमध्ये टेक्सटाइल थिमने सजवलं मतदानकेंद्रVikas Thackeray : नागपूर येथे विकास ठाकेरेंनी केलं मतदानVikas Amte Anandvan : विकास आमटे यांनी आनंदवन येथे बजावला मतदानाचा हक्कVikas Thackeray : हुकुमशाही सरकारला देशाची जनता निवडून देणार नाही - विकास ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News : सलग चौथ्या दिवशी पुणे गोळीबारनं हादरलं; जुन्या वादाचा राग मनात धरून झाडल्या थेट तीन गोळ्या
Pune Crime News : सलग चौथ्या दिवशी पुणे गोळीबारनं हादरलं; जुन्या वादाचा राग मनात धरून झाडल्या थेट तीन गोळ्या
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीत दारुसह किंवा पार्ट्यांचं प्रलोभन, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटींचा मुद्देमाल जप्त
Divyanka Tripathi : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया; आता प्रकृती कशी?
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया; आता प्रकृती कशी?
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं जवळपास निश्चित; कोणात्या खेळाडूंचा समावेश?, पाहा
टी-20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं जवळपास निश्चित; कोणात्या खेळाडूंचा समावेश?, पाहा
Mumbai Indians Rohit Sharma Hardik Pandya: शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Embed widget