एक्स्प्लोर

Nana Patole : संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केलीय; नाना पटोलेंचा खोचक टोला

एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात अटीतटीची लढाई असल्याचं दिसत आहे. तर यावरून आता अनेक दावे-प्रतिदावे केले जात असतानाच महाविकास आघाडी मध्ये सांगलीच्या जागेवरून परत एकदा खडाजंगी रंगल्याचे पाहायला मिळतंय. 

Nana Patole on Sanjay Raut : अठराव्या लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) अखेर सांगता झाली आहे. देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळी काल संपल्यावर साऱ्यांची उत्सुकता असलेल्या एक्झिट पोलचे (Result 2024 Exit Poll) आकडे समोर आले आहेत. महाराष्ट्रात (Maharashtra) भाजप (BJP) सर्वात मोठा पक्ष असल्याचं एबीपी सी वोटरच्या एक्झिट (ABP Cvoter Exit Poll) पोलमध्ये समोर आले आहे. एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीला यांच्यात अटीतटीची लढाई असल्याचं दिसत आहे. तर यावरून आता अनेक दावे-प्रतिदावे केले जात असतानाच महाविकास आघाडी मध्ये सांगलीच्या जागेवरून परत एकदा खडाजंगी रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. 

संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केलीय

सांगलीच्या जागेवरून बोलताना संजय राऊत यांनी आम्ही गोट्या  खेळायला आलेलो नसल्याचे म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. राजकारणात कुणीही गोट्या खेळायला बसले नाही. मात्र तुम्ही 100 टक्के राजकारण करत असाल, तर आम्ही 20 टक्के राजकारण आणि 80 समाजकारण करतो. संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केलीय.

तसेच संजय राऊत यांचा जन्म झाला ते रुग्णालय देखील काँग्रेसने निर्मांन केलंय, त्यांच्या गावात वीज-पाणी दवाखाने काँग्रेसच्या काळात पोहचले. संजय राऊत कालच लंडनहून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तिथल्या थंडीचा परिणाम आहे की इथल्या उन्हाचा, हे बघितले पाहिजे. मी त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही. अशा शब्दात प्रतिक्रिया देत  नाना पटोले (Nana Patole) यांनी  संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांना धमकावलं  

एक्झिट पोलच्या (Result 2024 Exit Poll) अंदाजावर भाष्य करताना पुढे नाना पटोले म्हणाले की, जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. तर पंतप्रधान मोदींचा करिश्मा आता पुरता उतरलेला आहे. आम्ही सुरवातीपासून सांगतोय की ही निवडणूक मोदी सरकार विरोधात जनता अशी राहिली आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि राहुल गांधी यांच्या यात्रेच्या माध्यमातून पोषक वातावरण तयार झाले आणि जनता विरुद्ध सरकार अशी ही निवडणूक झाली.

एक्झिट पोल आले आहेत ते गोदी मीडियाचे आहेत. त्यामुळे आमचे मत हे 4 तारखेला बघू. आमच्या सगळ्या उमेदवारांना आम्ही सांगितले आहे की शेवटचे मत मोजल्याशिवाय मतमोजणी केंद्रातून बाहेर पडायचे नाही. निवडणुकीत अटीतटीची लढाई होइल. केंद्रीय गृहमंत्रालयाने 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले आहे. भाजप घाबरले आहे हे यातून स्पष्ट होत असल्याचेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Nana Patole : राज्यात 40 च्यापुढे तर देशात 300 जागा जिंकू; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा विश्वास 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Nagpur Crime | एकालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्र्यांचं शांततेचं आवाहनDevendra Fadnavis on Nagpur | कायदा सुव्यवस्थेचं पालक करावं, मुख्यमंत्र्यांचं नागपूरकरांना आवाहनZero Hour Full EP : औरंगजेबाच्या कबरीचं काय करावं? का होतेय कबर काढून टाकण्याची मागणी? सखोल चर्चाNagpur Violance News : नागपुरात दोन गटात दगडफेक, पोलिसांनी केलं शांततेचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Embed widget