पंतप्रधान मोदींना आपल्या वचनांचा विसर पडलाय, त्यांनी स्वामीनाथन आयोग गुंडाळून ठेवलाय, सपकाळांचा हल्लाबोल
भारत कृषीप्रधान देश आहे. सध्या ट्रिलियन फ्रिलियन शब्द ऐकायला येतात. पण केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Harshvardhan Sapkal : भारत कृषीप्रधान देश आहे. सध्या ट्रिलियन फ्रिलियन शब्द ऐकायला येतात. पण केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार मोदींनी केला असल्याचे सपकाळ म्हणाले. मोदींना पंतप्रधान होऊन 11 वर्ष झालेत. या काळात शेतकऱ्यांची परिस्थिती खालवत चालली आहे असंही सपकाळ म्हणाले. मोदींना आपल्या वचनांचा पडला आहे. त्यांनी स्वामीनाथन आयोग गुंडाळून ठेवल्याचे सपकाळ म्हणाले.
शेती पिकवत असताना जेवढा खर्च येतो त्याच्या दीडपट एमएसपी स्वरुपात दिला जाईल असे सरकारने सांगितले होते. पण दीडपटाचे वचन जुमला ठरला आहे. कुठल्याही प्रकारची भाववाढ दिसत नाही असे सपकाळ म्हणाले. 300 ते 500 रुपयांची वाढी झाली आहे. मनमोहन सिंह पंतप्रधान होते तेव्हा काँग्रेस सरकारने एकूण 120 टक्के एमएसपीत वाढ झाली होती असे सपकाळ म्हणाले. दुप्पटपेक्षा अधिक वाढ काँग्रेसच्या काळात मिळालेली होती. मोदींच्या कार्यकाळ 2014 ते 2025 पर्यंत 45 टक्के वाढ झाली असल्याचे सपकाळ म्हणाले.
यवतमाळमधील दाभाडे गावातून 'क्या हुआ तेरा वादा' ही पदयात्रा काढणार
मोदी सरकारने जीएसटी लावला यामध्ये 18 टक्के वाढ झाली आहे. डिझेल 48 होतं आता 100 वर गेलं आहे. 100 टक्के यात वाढ झाली आहे. वीज, पाणी कीटकनाशक यांची देखील दरवाढ झालेली आहे असे सपकाळ म्हणाले. काँग्रेसच्या काळात खतांवर अनुदान, डिझेलवर अनुदान, कीटकनाशकांवर अनुदान दिलं जात होतं असेही सपकाळ म्हणाले. मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी काम करताना दिसत नाही. यवतमाळमधील दाभाडे गावातून 'क्या हुआ तेरा वादा' ही पदयात्रा 3 जूनपासून काढणार असल्याचे सपकाळ म्हणाले.
मोदींनी स्वामीनाथन आयोग गुंडाळून ठेवलाय
मोदींना आपल्या वचनांचा त्यांना पडला आहे. स्वामीनाथन आयोग मोदींनी गुंडाळून ठेवलेला आहे. ज्या गावात दीडपट हमीभाव दिला जाईल असं सांगितलं तिथून आम्ही मोर्चा काढत आहोत असे सपकाळ म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की, दोन दिवसांपूर्वी चुकीचं काम करु देणार नाही. त्यांनी कृषीमंत्र्यांना शिक्षा केली पाहिजे. कृषीमंत्र्यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा आमचा सवाल आहे. कृषीमंत्र्यांना मुख्यमंत्री बडतर्फ करणार का? हा प्रश्न आहे असं सपकाळ म्हणाले. शेतकऱ्यांची तुलना त्यांनी भिकाऱ्यासोबत केली आहे. ते वारंवार बेताल वक्तव्य करत असतात. शेतकऱ्यांना थेट 20 ते 50 हजारांचे अनुदान द्यावं असी माहिती सपकाळ यांनी केली. ताबडतोब शेतकऱ्यांना पैसे द्या असे ते म्हणाले. मंत्रिमंडळातून त्यांना काढलं नाही तर आम्हीच कृषीमंत्र्यांसमोर जाऊन ढेकळं ठेवणार आहोत. ते मारायचे की नाही हे शेतकरी ठरवतील असे सपकाळ म्हणाले.
























