एक्स्प्लोर
युद्धज्वर निर्माण करणारी भाषणं म्हणजे अपयश लपवण्याचा प्रयत्न : रत्नाकर महाजन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण हे शांत, संयमी आणि सगळ्यांना घेऊन जाणारं असल्याचं कौतुक सर्वच क्षेत्रातील लोकांनी केलं आहे. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली आहे.
मुंबई : कोरोनाचं संकट राज्यात वाढलं आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. हे संकट आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्याने राज्यातल्या जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या भाषणात लोकांना विश्वास देण्यासह घाबरुन न जाता सहकार्य करण्याची भाषा असते. त्यांचं भाषण हे शांत, संयमी आणि सगळ्यांना घेऊन जाणारं असल्याचं कौतुक सर्वच क्षेत्रातील लोकांनी केलं आहे. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली आहे. युद्धज्वर निर्माण करणारी आणि अस्मितेला विनाकारण फुंकर घालणारी भाषणे पुन्हा पुन्हा करणे म्हणजे प्रत्यक्ष उद्दिष्ट साध्य करण्यातील आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करणे आहे, असा अप्रत्यक्ष निशाणा रत्नाकर महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर साधला आहे. आपल्या फेसबुक पोस्टवरुन त्यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय उपचार व वैज्ञानिक विचार, दृष्टीची, व्यवहार्य उपायांची गरज आहे, असल्याचं म्हटलं आहे.
आपल्या या वक्तव्यावर खुलासा करताना त्यांनी दुसरी एक फेसबुक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, समाज माध्यमांवर मी एक विचारी भारतीय नागरिक म्हणून व्यक्तिशः कार्यरत असतो. तिथल्या माझ्या प्रत्येक विधानाचा व प्रतिपादनाचा संबंध सध्या मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी आहे त्या काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा अगोचरपणा करू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.
महाजन यांनी म्हटलं आहे की, ही लढाई नव्हती, नाही !, कोरोना हा एक आजार आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी उपयुक्त वैद्यकीय उपचार व वैज्ञानिक विचार, दृष्टीची व व्यवहार्य उपायांची गरज आहे. त्याऐवजी महाभारत की लडाई, शिवरायांचा महाराष्ट्र , लढवय्या महाराष्ट्र , या लढाईत लढणारे शूर सैनिक .... अशी युद्धज्वर निर्माण करणारी व अस्मितेला विनाकारण फुंकर घालणारी भाषणे पुन्हा पुन्हा करणे म्हणजे प्रत्यक्ष उद्दिष्ट साध्य करण्यातील आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न करणे आहे, असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
17 मे नंतर टाळेबंदी आणखी वाढविणे अनुचित,अव्यवहार्य आणि लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारे ठरेल. तसेच ते सरकारी यंत्रणा व नेतृत्वाच्या अकार्यक्षमतेचे द्योतक ठरेल, असं देखील त्यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.
दुसरीकडे, विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. कॉंग्रेसने आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहा जागा लढवण्याबाबत काँग्रेस अजूनही ठाम आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दुसऱ्या उमेदवारांची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत चिंता वाढलीय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement