एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबाद जिल्हा परिषदेत अखेर काँग्रेस-शिवसेनेची युती!
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये शिवसेना आणि काँग्रेसची अखेर युती झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचा तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचा उमेदवार असेल, असा फॉर्म्युला ठरवण्यात आलाय.
जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष बसवण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरु झाली आहे. पंचायत समिती सभापतीपदासाठी राज्यात अनेक ठिकाणी अभद्र युती पाहायला मिळाली. तेच चित्र जिल्हा परिषदेतही दिसत आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत 22 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. पण शिवसेनेने भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा घेण्याचा निर्णय घेतला आहे. उपाध्यक्षपद देण्याच्या अटीवर काँग्रेसनेही शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेची 62 एवढी सदस्य संख्या असून 32 ही मॅजिक फिगर आहे. शिवसेनेला 18 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 16 जागा मिळाल्यात. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेची सदस्यसंख्या मिळून 34 झाली आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषद -एकूण जागा (62)
- शिवसेना – 18
- भाजप – 22
- काँग्रेस – 16
- राष्ट्रवादी – 3
- मनसे – 1
- अपक्ष (भाजप पुरस्कृत) – 1
- अपक्ष – 1
संबंधित बातमी : जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement