एक्स्प्लोर

काँग्रेसची पालघर जिल्हा परिषदेतील पाटी आता कोरी, काँग्रेस चे एकमेव जिल्हा परिषद देवानंद शिंगडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

पालघर जिल्हा परिषदेतील काँग्रेस पक्षाचे एकमेव सदस्य देवानंद शिंगडे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पालघर जिल्हा परिषद : पालघर जिल्ह्यात काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेतील काँग्रेस पक्षाचे एकमेव सदस्य देवानंद शिंगडे यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विक्रमगड येथील एका कार्यक्रमात देवानंद शिंगडे यांच्या सोबत चिंचणी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच केतन पांचाळ,संजय यादव आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी  देखील भाजपची वाट धरली.एकमेव जि.प.सदस्य भाजपात गेल्याने काँग्रेसची पालघर जिल्हा परिषदेतील पाटी आत्ता कोरी झाली आहे.

जानेवारी 2020 साली झालेल्या पालघर जिल्हा परिषद निवडणूकीत देवानंद शिंगडे हे काँग्रेसचे एकमेव उमेदवार डहाणू तालुक्यातील चिंचणी गटातून निवडून आले होते. देवानंद शिंगडे हे खासदार राजेंद्र गावित हे काँग्रेसमध्ये असल्यापासून त्यांचे खंदे समर्थक मानले जात होते. त्यांचा भाजप प्रवेश हा गावितांसाठी देखील धक्का मानला जातो. 

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या जागा वाढल्या तर राष्ट्रवादीच्या तीन जागा घटल्या

एकेकाळी पालघर जिल्ह्यात प्रबळ असलेल्या काँग्रेसला मागील काही वर्षापासून उतरती कळा लागली असून जिल्ह्यात काँग्रेसचा सध्या एक ही खासदार, आमदार आणि जि. प.सदस्य उरलेला नाही.त्यातच नुकत्याच झालेल्या जि. प. पोटनिवडणुकीत राज्यात सत्ता असताना स्वबळावर लढून देखील सर्व जागांवर पराभव स्वीकारावा लागला होता.

जिल्ह्यात काँग्रेसकडे नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी अशी स्थिती असून नवीन जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांच्याविरोधात माजी जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील यांच्या गटाने बंड केले आहे . पालघर जिल्ह्यात शिवसेना, भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस,कम्युनिस्ट पक्ष,बहुजन विकास आघाडी हे प्रमुख पक्ष आपली स्थिती सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असताना सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसचा पाय मात्र अजून खोलात जात असल्याचे चित्र दिसत आहे. 

Palghar ZP By Election : पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता कायम? शिवसेनेच्या जागा वाढल्या

ZP Panchayat Samiti By Elections : नागपूर, नंदुरबार, अकोला आणि पालघर येथे काय आहेत राजकीय समीकरणं?

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bihar Elections 2025: महागठबंधनचा चेहरा तेजस्वी, एनडीएकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? Special Report
Pune Politics: धंगेकरांचे मोहोळांवर गंभीर आरोप, महायुतीत ठिणगी Special Report
Devendra Fadnavis politics : फडणवीसांची '२०२९' ची भविष्यवाणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण Special Report
Gopinath Munde Family : 'गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार कोण?' भुजबळांमुळे पुन्हा वाद Special Report
Thackeray Reunion: २४ वर्षांनी ठाकरे बंधू भाऊबिजेला एकत्र, राजकीय एकोप्याचे संकेत? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
भाऊबीज दिनी तरुणाचा अपघात, रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थे; मंत्री गुलाबराव पाटलांचा ताफा मदतीला
भाऊबीज दिनी तरुणाचा अपघात, रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थे; मंत्री गुलाबराव पाटलांचा ताफा मदतीला
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2025 | रविवार
Embed widget