एक्स्प्लोर

महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्याविरोधात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले... 

Nagpur News : नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आणला जातोय. मात्र कायद्यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा करत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

Nagpur News नागपूर :  नक्षलवादाचा (Naxal) बिमोड करण्यासाठी आणि शहरी नक्षलवादावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात नवा कायदा बनवला जातोय. "महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा" असं त्याचं नाव आहे. संविधानाला न मानणाऱ्या आणि शासनाविरोधात लढा पुकारणाऱ्या संघटनांवर नुसती बंदीच नाही, तर त्यांची संपत्ती जप्त करण्याचा अधिकारही सरकारला मिळणार आहे. संघटनांची बँक खाती गोठवणं, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तीन ते सात वर्षांसाठी तुरुंगात टाकण्याचे अधिकारही पोलिसांना या कायद्याद्वारे मिळणार आहेत. मात्र या नव्या  कायद्याविरोधात विरोधी पक्षाने या आधीच आक्षेप घेत या  कायद्याला विरोध केला आहे. अशातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी खळबळजनक दावा करत सरकारवर गंभीर आरोपही केले आहेत.

नव्या कायद्यामुळे लोकशाहीला मोठा धोका- विजय वडेट्टीवार 

"महाराष्ट्र जन सुरक्षा  कायदा" झाल्यास त्याला मोठा विरोध होण्याची ही शक्यता आहे. अनेकांना महाराष्ट्रात आता हा कायदा आणण्याची गरजच काय असा प्रश्न पडला आहे. तर प्रस्तावित कायद्यातील कठोर तरतुदींमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा हा शहरी नक्षलवाद विरोधात आणण्याचा सरकारचा हेतू असला तरी हा कायदा विरोधकांवर दबाव आणण्यासाठी केला जात असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. या कायद्यामुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण होणार असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू- विजय वडेट्टीवार  

राज्यात कोणी सरकार विरोधात आंदोलन केले, एखादे स्टेटमेंट दिले, तरी कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात आहे. अधिवेशन संपण्याच्या दोन दिवस आधी हे बिल आणल्या गेलं. त्यावेळी आम्ही त्याला विरोध केला म्हणून ते मंजूर होऊ शकले नाही. आता अध्यादेश आणण्याची चर्चा आहे. मात्र आमचा त्याला विरोध कायम राहील आणि गरज पडली तर रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू. असा इशाराही  विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे.

वाद थांबवण्यात मुख्यमंत्री गृहमंत्री अपयशी ठरले का?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांची घरी जाऊन भेट घेतली. छगन भुजबळ हे आज सकाळी अचानक शरद पवारांच्या भेटीला गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.  छगन भुजबळांनी शरद पवारांशी तब्बल दीड तास चर्चा केली. छगन भुजबळांनी शरद पवारांशी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याची माहिती स्वत: मंत्री छगन भुजबळांनी भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन दिली. याविषयी भाष्य करताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

मराठा विरुद्ध ओबीसी वाद मिटवावा, असे छगन भुजबळ यांना वाटत आहे, मग मग हा वाद थांबवण्यात मुख्यमंत्री गृहमंत्री अपयशी ठरले का? भुजबळ यांनी ओबीसी आंदोलनात जी वक्तव्य केली त्यातून वाद मिटवण्याचा काम केले की वाद वाढवण्याचे काम केले? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित करत छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे. पवार साहेब यांच्या इशाऱ्यानंतर विरोधक सर्वपक्षीय बैठकीला गेले नाही हे पूर्णपणे खोटे असल्याचे म्हणत त्यांनी छगन भुजबळांनी केलेले आरोपही फेटाळून लावले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan AttackedABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025Saif Ali Khan Attacked Update : सैफला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटोवाल्याने सांगितला घटनेचा थरारSaif Ali Khan Attcked Update : सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून 35 पथकांची स्थापना, 20 लोकल तर 15 क्राईम ब्रांच पोलिसांची पथकं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Embed widget