एक्स्प्लोर

विधीमंडळात नाणार प्रकल्पावरुन शिवसेनेसह विरोधक आक्रमक

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह शिवसेनेच्या आमदारांनीही नाणार प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी केली.

नागपूर:  नाणार प्रकल्पावरुन विरोधक आजही विधीमंडळात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह शिवसेनेच्या आमदारांनीही नाणार प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी केली. विरोधकांनी नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात गुपचिळी बाळगणाऱ्या नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली असता, आंदोलकांनी त्यांना हाकलून दिलं आणि निवडणूक जवळ आली म्हणून आपण आलात का? असा सवाल विचारल्याचं म्हटलं. त्यावर शिवसेनेच्या आमदारांनी हरकत घेत विखे पाटलांनी माफी मागण्याचा आग्रह धरला. भास्कर जाधव, आमदार राष्ट्रवादी काँग्रेस “नाणार प्रकल्पासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला आहे. काही जण त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी प्रकल्पाला विरोध करत आहे, काहींना निवडणूक जिंकायची आहे, काहींना आपल्या पक्षाचा राजकीय आधार वाढवायचा आहे. मात्र कोणीही या प्रकल्पाचा भविष्यातला धोका लक्षात घेत नाही आहे. प्रस्तावित नाणार प्रकल्प आणि जवळच होत असलेले अणू ऊर्जा प्रकल्प यादरम्यान फक्त 1.2 किमीचे हवाई अंतर आहे. जर भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर फक्त रत्नागिरीच नव्हे तर सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर हे 4 जिल्हे धोक्यात येतील”, असं भास्कर जाधव म्हणाले. नाणार प्रकल्पाचं आम्हाला राजकारण करायचं नाही. अनिल काकोडकर यांनी अणू ऊर्जा प्रकल्प आणि ग्रीन ऑईल रिफायनरी जगाच्या पाठीवर एकाच ठिकाणी कुठेच नाही असं म्हटलं होतं. या दोन प्रकल्पात फक्त 13 ते 14 किलोमीटर अंतर आहे. याचा धोका फक्त 17 गावांना नाही तर अनेक जिल्ह्यांना आहे. कोकण उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. आम्ही जर जगलो तर रोजगाराचा उपयोग आहे. सरकारने हट्टीपणा करू नये. शिवसेनेनं फक्त राजकीय हेतूने नाही तर वैधानिक पद्धतीने, अभ्यासपूर्वक, नियमांची उजळणी करून आरोप करावे, असा चिमटा भास्कर जाधवांनी काढला. राधाकृष्ण विखे पाटील नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. मारुती मांजरेकर, जिल्हा राजापूर मधले व्यक्ती पोलीस रेकॉर्डवर अनेक वर्षांपासून गायब आहेत. मात्र त्यांच्या नावाने भूसंपादनाला अनुमती दिल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. अश्विनी आघाशे यांनी जमिनीचे खोटे दस्तऐवज बनवल्याची तक्रार राजापूर पोलीस स्थानकात केली आहे. या सभागृहात काही लोकांचा नाणारला बेगडा विरोध आहे. सर्व विषय बाजूला ठेऊन नाणारवर चर्चा व्हावी. शिवसेना आमदार सुनील प्रभू नाणारवासीयांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे. सभागृहात असो किंवा सभागृहा बाहेर, शिवसेना नाणारच्या विरोधातच आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान मुंबईत असताना उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली. संबंधित बातम्या ग्राऊंड झीरो रिपोर्ट : नाणार प्रकल्प काय आहे?

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Dharashiv BJP: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरूच! वरिष्ठांच्या स्ट्राइकनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ; सोशल मीडियावरच्या 'ट्रेंड'ची राजकीय वर्तुळात चर्चा
धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरूच! वरिष्ठांच्या स्ट्राइकनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ; सोशल मीडियावरच्या 'ट्रेंड'ची राजकीय वर्तुळात चर्चा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Embed widget