Satej Patil on Bacchu Kadu : बच्चू कडूंना पाहताच सतेज पाटील थांबले, म्हणाले, ते लवकरच मविआत येणार, मी त्यांना घेऊन जाणार
राज्याचा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, काँग्रेस आमदार तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी मिश्किल शब्दांत आमदार बच्चू कडू यांच्या बाबत भाष्य केलंय.
मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प (Budget 2024) मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) मोठी घोषणा केली. दरम्यान, आजपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया (Offline Application Process) सुरू झाली आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी 15 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
अशातच अमरावतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीत (Amravati News) लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भाष्य करताना आमदार बच्चू कडूंनीही (Bacchu Kadu) याविषयी खेद व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. तर या योजने संदर्भात सरकारने नोंदणी प्रक्रिया रद्द करून सरसकट 21 ते 65 वर्षांच्या आतील महिला आहेत त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करावी, अशीही मागणी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलीय.
बच्चू कडू मविआत येणार, मी घेऊन जाणार- सतेज पाटील
दरम्यान, आमदार बच्चू कडू विधीमंडळाच्या परिसरात एबीपी माझा च्या प्रतिनिधीशी संवाद साधत असताना काँग्रेस आमदार तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी मिश्किल शब्दांत आमदार बच्चू कडू लवकरच मविआत येणार, त्यांना मी घेऊन जाणार. असे म्हणते बच्चू कडूंबाबत भाष्य केलं आहे. सतेज पाटील यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही नेत्यासह उपस्थितांमध्ये हसा पिकाला, मात्र हे वक्तव्य आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सत्यात तर उतरणार नाही ना? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेत्याचे पाच दिवसांसाठी निलंबन
राज्याचा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, संसदेच्या अधिवेशनादरम्यान खासदार राहुल गांधी यांनी हिंदू समाजाबाबत केलेल्या विधानावरून सध्या वातावरण चांगलेच तापलं असताना त्याचे पडसाद आज विधानसभेतही उमटताना बघायला मिळाले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यातील वादानंतर अंबादास दानवेंनी केलेल्या शिवीगाळचे प्रकरण आता त्यांना भोवलं आहे. दरम्यान विधानपरिषदेतून त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तर या निलंबनाच्या कारवाईवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या