एक्स्प्लोर

गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यास नकारात्मक विचार नाहीसे होतात, यशोमती ठाकूरांचा अजब दावा

काही दिवसांपूर्वीच आपल्या विधानामुळे वादात सापडलेल्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यास नकारात्मक विचार नाहीसे होत असल्याचा वादा यशोमती यांनी केला आहे.

अमरावती : गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यास नकारात्मक विचार नाहीसे होतात, असं अजब विधान महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. तिवसा तालुक्यातील सार्शी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात यशोमती ठाकूर यांनी गाईवरुन अजब विधान केलं आहे. काही दिवसांपूर्वीच यशोमती ठाकूर यांनी अजून खिसे गरम झाले नाही, असं विधान करुन वाद ओढावून घेतला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा त्यांनी अजब विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. तिवसा तालुक्यातील सार्शी येथे गावाचे दैवतं समजल्या जाणाऱ्या एका मृत गाईच्या पुण्यतिथी निमित्ताने गावात सात दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी समारोपीय कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. "आपण जे काम करतो, त्याला धर्म मानतो, आपण जो विचार करतो त्याला धर्म म्हणतो, सातत्याने विठ्ठलाचे नामस्मरण केले तर आपल्या आकांक्षा इच्छा पूर्ण होतात. मात्र, विठ्ठलाच्या पाया पडणे म्हणजे झालं असं नाही. आज तरुण युवकांना वेगवेगळ्या पदावर जायचं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, यासाठी आपण विठ्ठलाचे नामस्मरण केले पाहिजे", असा सल्ला यशोमती ठाकूर यांनी उपस्थितांना दिला. यशोमती यांचा अजब दावा -  पर्सनालिटी डेव्हलपमेंटचे खूप सारे कोर्स येत असून मोठे मोठे लोक त्याचं प्रशिक्षण घेतात. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसाही घेतला जातो. मात्र, यामुळे आपण आपली संस्कृती विसरतो. आपल्यात जे नकारात्मक विचार आहे, ते गाईच्या दर्शनामुळे, गायीच्या पाठीवरुन हात फिरविल्याने नाहीसे होतात. हा चमत्कार आहे, हे सर्व आपल्या संस्कृतीमध्ये सांगितले असल्याचं अजब विधान यशोमती ठाकूर यांनी यावेळी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचा आरोप होऊ लागला आहे. यापूर्वीही वादात - "आत्ताच शपथ घेतली, अजून खिसे गरम व्हायचे आहेत. जे लोक आता विरोधात आहेत, त्या जुन्या सत्ताधाऱ्यांकडे खूप पैसे आहेत. त्यांच्याकडून लक्ष्मीदर्शन होत असल्यास नाही म्हणू नका", असे वादग्रस्त विधान राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं होतं. या विधानामुळे यशोमती ठाकूर यांच्यावर बरीच टीका झाली होती. संबंधित बातमी - यशोमती ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य; निरुपम यांची टीका, तर सोमय्यांची तक्रार CAA | काँग्रेसशासित राज्यांमधील विधिमंडळात सीएएविरोधात कायदेशीर ठराव मंजूर करणार | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
SIR News : मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
Maharashtra Breaking LIVE Updates:सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
Embed widget