एक्स्प्लोर

Sunil Kedar : केसाला सुद्धा धक्का लागला तर पूर्ण नागपूर जिल्हा पेटवून टाकू, काँग्रेस नेते सुनील केदारांचा धमकी वजा इशारा 

Nagpur News : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड वायरल होतो आहे. सुनील केदार यांनी धमकीवजा प्रखर शब्दात नागपूर पेटण्याची भाषा केली आहे.

Nagpur नागपूर : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड वायरल होतो आहे. सुनील केदार यांनी धमकीवजा प्रखर शब्दात नागपूर पेटण्याची भाषा केली आहे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ अलिकडे वायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. नागपूर जिल्ह्यातील सातगाव मध्ये पुरुष सरपंच आणि महिला उपसरपंचात वाद झाले होते. त्यात सरपंच योगेश सातपुते यांनी महिला उपसरपंचाला जातीवाचक शिव्या देत धमकी दिली होती. त्याप्रकरणी महिला उपसरपंचाच्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलीस स्टेशनमध्ये सातगावचे सरपंच योगेश सातपुते विरोधात एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

त्याच सातगाव परिसरात सुनील केदार यांची सभा झाली असता, केदार यांनी सरपंच योगेश सातपुते यांचे नाव घेत तुमच्या केसाला सुद्धा धक्का बसला तर पूर्ण नागपूर जिल्हा पेटवून टाकू, असे धमकीवजा शब्द वापरले आहेत. आता नागपूर जिल्ह्यात सुनील केदार यांच्या धमकीवजा शब्दांचा तोच व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे.

सहकार मंत्र्यांसमोर त्यांचं म्हणणं तोंडी मांडण्याची केदारांना मुभा

नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा प्रकरणात काँग्रेस नेते आमि माजी मंत्री सुनिल केदार यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. बँकेत 150 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दोष सिद्ध झाला आहे. याप्रकरणी सुनील केदार यांना सहकार मंत्र्यांसमोर त्यांचा म्हणणं तोंडी स्वरूपात ठेवण्यास नागपूर खंडपीठाने मंजुरी दिली आहे.

दरम्यान, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुनील केदार यांना त्यांचं म्हणणं तोंडी नव्हे, तर लेखी स्वरूपात मांडा असे सांगत म्हणणं तोंडी मांडण्याची केदारांची मागणी अस्वीकार केली होती. त्याच्या विरोधात केदारांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. केदार यांना नागपूर खंडपीठान सहकार मंत्र्यांसमोर त्यांचं म्हणणं तोंडी मांडण्याची मुभा दिली आहे. त्यामुळं सुनिल केदार हे आता त्यांचं म्हणणं सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर मांडणार आहेत. 

न्यायालयाने दोषी सिद्ध ठरवत पाच वर्षांची शिक्षा 

150 कोटी रुपयांच्या नागपूर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना आधीच नागपुरातील न्यायालयाने दोषी सिद्ध ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सध्या सुनील केदार त्याच प्रकरणी जामिनावर बाहेर आहेत. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार केदार यांच्याकडून घोटाळ्याची रक्कम व्याजासकट वसूल करण्यात यावी, या संदर्भातली सुनावणी सध्या सहकारमंत्र्यांसमोर सुरू आहे.

ही सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. त्याप्रकरणी आपलं म्हणणं तोंडी स्वरूपात मांडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सुनिल केदारा यांनी केली होती. त्याच संदर्भात ही घडामोड घडली आहे. दरम्यान, आता सुनिल केदार यांना सहकार मंत्र्यांसमोर आपलं म्हणणं तोंडी मांडण्याची मुभा मिळाल्यामुळे बँक घोटाळ्याची रक्कम सहकार कायद्यानुसार वसूल करण्यासंदर्भातल्या कायदेशीर प्रक्रियेत आणखी उशीर होण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget