एक्स्प्लोर
Advertisement
बनावट पिस्तुलाची खरेदी-विक्री करताना काँग्रेस नगरसेवक अटकेत
पोलिसांनी शस्त्र तस्कर रवी उमाळेवर पाळत ठेवली आणि त्याला शहरातील गुलीस्था नगरमध्ये शस्त्र विक्री करताना अटक केली.
यवतमाळ : यवतमाळमध्ये देशी बनावटीच्या पिस्तुलाची खरेदी-विक्री करताना काँग्रेस नगरसेवकाला रंगेहाथ अटक करण्यात आली. यवतमाळ नगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक असलेले सलीम सागवान यांच्यासह 5 जणांना पोलिसांनी अटक केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
यवतमाळ पोलिसांच्या टोळीविरोधी पथकाने सलीम सागवान यांच्यासह पाच जणांना रंगेहाथ अटक केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील रवी उमाळे ही व्यक्ती यवतमाळमध्ये पिस्तुलाची तस्करी करण्यासाठी येत असल्याची माहिती टोळी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शस्त्र तस्कर रवी उमाळेवर पाळत ठेवली आणि त्याला शहरातील गुलीस्थानगरमध्ये शस्त्र विक्री करताना अटक केली.
उमाळेसह काँग्रेसचे नगरसेवक सलीम सागवान, राम शर्मा, तातू मुराब, निलेश सोनोरे या 4 जणांना सुद्धा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 6 पिस्तुल, 12 राऊंड असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बुलढाण्यातील संग्रामपूरहून शस्त्र कसे आले, या तस्करीचे मूळ सुरुवात कुठून आहे, याबाबत पोलीस तपास करीत आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement