एक्स्प्लोर
Advertisement
बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत अंकिता पाटील यांचा विजय
हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या जागेवर 23 जून रोजी मतदान झालं होतं.
इंदापूर : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बहुमताने विजय झाला आहे. अंकिता पाटील 17 हजार 274 मतांनी विजयी झाल्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या जागेवर 23 जून रोजी मतदान झालं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा
अंकिता पाटील यांनी नुकताच सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत अंकिता पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता.
कोण आहेत अंकिता पाटील?
- अंकिता पाटील यांचं शिक्षण परदेशात झालं आहे.
- त्या सध्या शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष तसंच इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या सदस्या आहेत.
- हर्षवर्धन पाटील यांचा सोशल मीडिया आणि शिक्षण संस्थांची जबाबदारी अंकिता पाटील यांच्याकडे आहे.
पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात
अंकिता पाटील यांच्या रुपाने पाटील घराण्यातील तिसरी पिढीच्या राजकारणात आली आहे. हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकरराव पाटील दोन वेळा बारामतीचे खासदार होते. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस वाढवण्यात त्यांनी मोठं योगदान दिलं. यानंतर हर्षवर्धन पाटील 1992 नंतर राजकारणात सक्रिय झाले. राज्य सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवलं. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढलेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement