एक्स्प्लोर

कृष्णा आंधळे नाशकात? व्हायरल फोटोमुळे एकच गोंधळ, CCTV तपासले, सर्च ऑपरेशन केल्यावर पोलिसांनी सांगितलं..

Krushna Andhale: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील संशयित आरोपी कृष्णा आंधळे नाशिकरोड येथील मुक्तिधाम मंदिर परिसरात दिसल्याच्या अफवांनी शहरात मोठी खळबळ माजवली.

Nashik: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्याप्रकरणाने राजकारणाला वेगळंच वळण आलं आहे. हत्याकांडातील संशयित आरोपींना पकडल्यानंतर वाल्मिक कराडवरही (Walmik Karad) मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अजूनही यातील एक आरोपी फरार आहे. दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील संशयित आरोपी नाशिकमध्ये असल्याच्या अफवांनी एकच खळबळ उडाली. संशयित आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale)  नाशिकरोड भागातील  मुक्तिधाम मंदिर परिसरात फिरत असल्याची रात्री पसरली शहरात चर्चा रंगली होती. या अफवेने नाशिक पोलीस अलर्ट मोडवर आले होते. या संपूर्ण परिसरात पोलिसांनी पहाणी केली. मंदिर परिसरातील CCTV फुटेजही तपासले. रात्रभर झालेल्या सर्च ऑपरेशननंतर सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीचे फोटो कृष्णा आंधळे असल्याच्या गैरसमजाने व्हायरल झल्यानं  खळबळ उडाली होती असं समोर आलं. हे फोटो आरोपी कृष्णा आंधळेचे नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Santosh Deshmukh Case)

नाशिक पोलिसांनी अफवेच्या गोंधळानं केलं सर्च ऑपरेशन

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील संशयित आरोपी कृष्णा आंधळे नाशिकरोड येथील मुक्तिधाम मंदिर परिसरात दिसल्याच्या अफवांनी शहरात मोठी खळबळ माजवली. रात्री उशिरा ही चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यामुळे नाशिक पोलिस तत्काळ ॲक्शन मोडवर (Nashik Police) आले. उपनगर पोलिसांनी मुक्तिधाम मंदिर परिसराची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज आणि लोजिंग रेकॉर्डची बारकाईने तपासणी करण्यात आली. अफवांचा आधार घेत, नागरिकांनी ज्या व्यक्तीला कृष्णा आंधळे म्हणून ओळखले, ती खरंच तोच आहे की नाही याची पडताळणी करण्यात आली. (Krushna Andhale)

सोशल मीडियावर व्हायरल फोटोवरून गोंधळ

कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचे भासवणारे काही फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. या फोटोमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हे फोटो कृष्णा आंधळेचे नसल्याचे स्पष्ट झाले. उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सर्च ऑपरेशन करून अफवा खोट्या असल्याचे सांगितले. नागरिकांना खोट्या अफवांवर (False Information) विश्वास न ठेवण्याचे आणि परिस्थिती शांत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Social Media)

हेही वाचा:

मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Eknath Shinde Municipal Corporation Election Result 2026 : जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
Eknath Shinde BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
Embed widget