एक्स्प्लोर
रत्नाकर गुट्टेंविरोधात पत्नीची तक्रार, मारहाणीचा गुन्हा दाखल
मारहाण करणे, शारिरिक, मानसिक त्रास देणे, संपत्ती नावावर करुन का देत नाही म्हणून धमकावणे, असे आरोप सुदामती गुट्टे यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यावर लावले आहेत. रत्नाकर गुट्टे हे 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते विजय गुट्टे यांचे वडील आहेत.
बीड : शेतकऱ्यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्याच्या आरोपावरुन वादात आलेले रत्नाकर गुट्टे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गुट्टे यांच्या पत्नी सुदामती गुट्टे यांनी त्यांच्याविरोधात परळी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणे, शारिरिक, मानसिक त्रास देणे, संपत्ती नावावर करुन का देत नाही म्हणून धमकावणे, असे आरोप सुदामती गुट्टे यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यावर लावले आहेत. रत्नाकर गुट्टे हे द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते विजय गुट्टे यांचे वडील आहेत.
तक्रारीवरून परळी पोलीस स्टेशन मध्ये रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रत्नाकर गुट्टेंसह आणखी आठ जनांवर गुन्हा दाखल केला आहे. रत्नाकर गुट्टेंवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सुदामती गुट्टे यांनी केलेल्या तक्रारीत रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रत्नाकर गुट्टे हे बाहेरख्याली असल्याचे सांगत, रात्री अपरात्री ते परस्त्रियांना घरी घेऊन येतात. मला घराबाहेर काढण्याची धमकी देतात. तू मला पसंत नाही असे गुट्टे सांगतात, असेही सुदामती गुट्टे यांनी तक्रारीत म्हटले आहे. एवढंच नाही तर रत्नाकर गुट्टे आणि त्यांचा भाऊ तसेच इतर सहकारी मला पिस्तुलाचा धाक दाखवतात असाही आरोप सुदामती यांनी केला आहे.
रत्नाकर गुट्टे महाराष्ट्राचे नीरव मोदी : धनंजय मुंडे
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावे 5 हजार 500 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता. गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे छोटे नीरव मोदी असल्याचंही ते म्हणाले होते. "रत्नाकर गुट्टेंनी कोट्यवधी रुपये बुडवले. गुट्टेंनी शेतकऱ्यांची फसवणूक करुन शेकडो शेल कंपन्यांची स्थापना केली. 23 बनावट कंपन्या तयार करुन शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेतलं आणि हे प्रकरण दाबण्यासाठी शेतकऱ्यांना धमकावलं, तसंच दमदाटीही केली," असा दावा धनंजय मुंडे यांनी केला होता.
कोण आहेत रत्नाकर गुट्टे?
रत्नाकर गुट्टे परळी तालुक्यातल्या दैठणाघाटचे रहिवाशी. परळीच्या थर्मल प्लाँटवर मजूर म्हणून काम करत होते. थर्मल स्टेशनमधली छोटी मोठी कामं घ्यायला सुरुवात केली. तिथून पुढे गुट्टे मोठे कंत्राटदार झाले. सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या माध्यमातून गुट्टेंनी देशभरात अनेक वीज प्रकल्पांची कामं केली आहेत.
रत्नाकर गुट्टे हे अजित पवारांचे निकटवर्तीय होते. गंगाखेड शुगर या कारखान्याचा शुभारंभही शरद पवार यांनी केला होता. रत्नाकर गुट्टेंच्या पत्नी सुधामती गुट्टे या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस होत्या. सध्या रत्नाकर गुट्टे पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जात असले तरी गुट्टे सध्या महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षात आहेत. मागची विधानसभा गुट्टेनी जानकरांच्या पक्षातर्फे लढली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement