गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का, एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरव पाटील यांची हकालपट्टी
पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे पदावरुन हटववण्यात आलेय. एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील (saurav patil) हे गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांचे जवळचे नातेवाईक आहेत.
मुंबई : एसटी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांनी (commissioner for cooperation and registrar cooperative societies maharashtra) जोरदार दणका दिलाय. एकही पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे पदावरुन हटववण्यात आलेय. एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील (saurav patil) हे गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांचे जवळचे नातेवाईक आहेत. आरबीआयची पूर्व परवानगी न घेताच पदावर बसवल्यानंतर सहकार खात्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता थेट कारवाई करण्यात आली आहे.
एसटी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांच्याकडून पात्रता निकषाची पुर्तता होत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना किमान आठ वर्षांचा अनुभव हवा असतो. त्याशिवाय 35 वर्ष वयाची अट आहे. पण सौरभ पाटील यांचं वय 25 वर्षांच्या आसपास आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे आठ वर्षांचा अनुभवही नाही. त्याशिवाय आरबीआयची परवानगी घेणेही बंघनकारक असते. पण सौरभ पाटील कोणत्याच निकषात बसत नव्हते. त्यामुळे अखेर सहकार आयुक्तांनी त्यांच्यावर कारवाई केली. दरम्यान, एसटी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून सौरभ पाटील हे कोणत्याही निकषात बसत नव्हते, त्यामुळे सहकार आयुक्तांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. मागील तीन ते चार महिन्यात याप्रकरणाबाबत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.
मागील तीन ते चार महिन्यात एसटी बँकसंदर्भात मोठ्या घडमोडी घडल्या आहेत. बँकेतील ठेवीही काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अंदाजे 480 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेतून काढल्याचे समोर आलेय. त्यानंतर एसटी बँकेच्या संचलाक मंडळानेही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता सहकार खाते सक्रीय झाले असून त्यांनी सौरभ पाटील यांच्यावर मोठी कारवाई केली. एसटी बँकेतील 480 कोटींच्या ठेवी काढल्याचं समोर आल्यानंतर याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. आता सहकार आयुक्तांनी एसटी बँकेला पत्र लिहून सौरभ पाटील यांना आठवडाभरात काढून टाकण्याचे निर्देश दिलेत. त्याशिवाय याच कालावधीत नव्या संचालकांची नेमणूक करा, असेही आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असेही पत्रात म्हटलेय.
सौरभ पाटील यांच्यावर कारवाईचा बडगा उघारण्यात आलाय. हा गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. गुणरत्त सदावर्ते यांच्या पॅनेलटी एसटी बँकेवर सत्ता आहेत. त्यांचे नातावेईक सौरभ पाटील हे संचालक झाले होते. पण ते कोणत्याही निकषात बसत नव्हते. याआधी सहकार आयुक्तांनी पत्र लिहून याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता सौरभ पाटील यांना काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.