एक्स्प्लोर

कॉमेडीयन प्रणित मोरे मारहाण प्रकरण! पोलिसांनी जप्त केलेले सीसीटीव्ही फुटेज द्यावेत, प्रणित मोरेची मागणी

सोलापुरात मारहाण झाल्यानंतर कॉमेडीयन प्रणित मोरेने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी ज्यांनी या प्रकरणी मोलाची साथ दिली त्या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.

Comedian Pranit More assault case : सोलापुरात मारहाण झाल्यानंतर कॉमेडीयन प्रणित मोरेने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी ज्यांनी या प्रकरणी मोलाची साथ दिली त्या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. मात्र, अद्याप मुख्य आरोपी फरार आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही पोलिसांनी जप्त केल आहे, ते फुटेज देण्यात यावेत, अशी मागणी कॉमेडीयन प्रणित मोरेने केली आहे. सुशीलकुमार शिंदेचे नातू, अभिनेता वीर पहारिया बाबतीत प्रणित मोरेने विनोद केल्याने प्रणित मोरेला मारहाण करण्यात आली होती. 

नेमकं प्रकरण काय?

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला  सोलापुरात  मारहाण करण्यात आली आहे. सोलापुरातील एका कार्यक्रमात स्काय फोर्स फेम अभिनेता वीर पाहाडियावर (Veer Paharia) जोक केल्यामुळे दहा ते बारा जणांच्या गटानं हल्ला केल्याची माहिती स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेनं आपल्या सोशल मीडिया (Social Media) हँडलवर पोस्ट करुन दिली. तसेच, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याची माहितीही प्रणित मोरेनं आपल्या पोस्टमधून दिली होती. अशातच आता याप्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून 10 ते 12 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू, अभिनेता वीर पहाडिया याला लक्ष्य करून स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांनं सोलापुरातील एका कार्यक्रमात जोक केला. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेला एक गट नाराज झाला. त्यातून मारहाणीचा प्रकार घडला. या बाबतीत कॉमेडीयन प्रणित मोरे यानं इंस्टाग्रामवरून पोस्ट करतं माहिती दिली होती, तर वीर पहाडियानं देखील दिलगिरी व्यक्त केली होती. या संपूर्ण प्रकरणानंतर आरोपी तन्वीर शेख आणि त्याच्या अन्य 10-12 साथीदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून सोलापूरच्या सदर बाजार पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 189(2), 190, 191(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विविध कलमान्वये गुन्हा दाखल

या संपूर्ण प्रकरणानंतर आरोपी तन्वीर शेख आणि त्याच्या अन्य 10-12 साथीदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून सोलापूरच्या सदर बाजार पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 189(2), 190, 191(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोलापूर पोलिसांनी प्रणित मोरेला जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं गेलं, पण ते आले नाहीत. तसेच, पोलिसांनी प्रणित मोरेचा शो ज्या सोलापुरातील हॉटेलमध्ये झाला, त्या हॉटेल मालकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.  

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget