एक्स्प्लोर

Mask Free at College Campus : अखेर मास्क फ्री झाला कॉलेज कट्टा! विद्यार्थ्यांची घुसमट एकदाची थांबली

मास्क आणि निर्बंधांची सक्ती नसली तरी, कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी काल सांगितलं

Mask Free at College Campus : महाराष्ट्र सरकारकडून काल महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले, त्यामुळे नागरिकांना तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधपासन मुक्तता मिळाली आहे. महाराष्ट्र निर्बंधमुक्त झालाय तसेच मास्क सुद्धा आता ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे मास्क मुक्ती झाल्यानंतर कॉलेज परिसरात, कॉलेज कट्ट्यावर होणारी विद्यार्थ्यांची घुसमट आता एकदाची थांबली आहे. यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
मास्क मुक्तीनंतर कॉलेजच्या कट्ट्यावर रंगली चर्चा
 
मास्क आणि निर्बंधांची सक्ती नसली तरी, कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं.  यानंतर आता या महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्क न घालता मुक्तपणे फिरता येणार आहे. इतकेच काय तर कॉलेज कट्ट्यांवर मास्क काढून सेल्फी सुद्धा घेता येणार आहे. मास्क मुक्तीनंतर कॉलेजच्या कट्ट्यावर वेगळीच चर्चा रंगली कारण या सगळ्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा आनंद झाला आहे
 
मास्क मुक्ती झाल्याने कॉलेज कुमारांना किती आनंद झालाय ?
 
मास्क मुक्ती झाल्याने कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिलीय. दादरच्या कीर्ती कॉलेजच्या कट्ट्यावर या निर्णयासंदर्भात विद्यार्थ्यांना काय वाटतं याबाबत एबीपी माझाच्या रिपोर्टरसोबत खास बातचीत केलीये. विद्यार्थी म्हणाले, मास्कमुक्ती झाल्याने आता व्यवस्थित लिपस्टिक लावता येणार, मोकळेपणाने हसता येणार, लांबून सुद्धा आता आपल्या जवळच्या व्यक्तीला ओळखता येणार, चष्मावाल्यांचा त्रास तर अधिकच कमी होणार, आता मास्क काढून सुद्धा आधी सारखे सेल्फी काढता येणार, आता आम्हाला दंड भरावा लागणार नाही. अशी प्रतिक्रिया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून आल्याने कॉलेज कुमारांची घुसमट खऱ्या अर्थाने थांबणार आहे.

महाराष्ट्रात आजपासून काय बदलले? 
- 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्यात आले आहे.
- मार्च 2020 ते 31 मार्च 2022 जवळपास दोन वर्षे लागू असलेले कोरोनाचे निर्बंध संपुष्टात आले आहेत
- गुढीपाडवा शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान उत्साह साजरा करता येणार
- केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग कायम असेल
- मात्र महाराष्ट्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल
- हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही
- लग्न किंवा कौटुंबीक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही.
- बस, लोकल आणि रेल्वेने प्रवास करताना लशीचं प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. 
- सार्वजनिक ठिकाणं, मॉल, बगिचे याठिकाणी मास्क वापरणे किंवा लशीचं प्रमाणपत्र धाखवण्याची गरज भासणार नाही.
- महारष्ट्रभरात सर्वधर्मीयांचे सर्व उत्सव निर्बंधमुक्त असतील, यात्रा-जत्रा धुमधडाक्यात होणार
- निर्बंधामुळे उद्योग आणि व्यवसायांवर आलेली बंधनं हटली आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain : मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Mumbai Rain : मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Wadala Rain Accident : मुंबईत पावसाचा हाहाकार! वडाळ्यात कोसळला टॉवर ABP MajhaMumbai Rain Accident : मुंबईत मुसळधार, घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपवर कोसळला बॅनर ABP MajhaTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 May 2024 : 04 PM : ABP MajhaMumbai Rain : उपनगरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; ठाणे,बदलापूर ,कल्याणमध्ये पावसाची बॅटिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain : मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Mumbai Rain : मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
Embed widget