कुठं थंडीचा कडाका तर कुठं तापमानात वाढ, पुढील 5 दिवस राज्यात कसं असणार हवामान?
राज्यातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ वातावरण तर कुठं कडाक्याची थंडी आहेत. हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 डिसेंबरपर्यंत राज्यात थंडीचा जोर असणार आहे.
Maharashtra Weather : राज्यातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ वातावरण तर कुठं कडाक्याची थंडी आहेत. दरम्यान, ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 डिसेंबरपर्यंत राज्यात थंडीचा जोर असणार आहे. त्यानंतरच्या पुढील पाच दिवस म्हणजे 25 ते 29 डिसेंबर दरम्यान, तापमानात अजुन वाढ होवून ऊबदारपणा जाणवेल, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. मात्र, महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याचे खुळे म्हणाले.
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकणमध्ये किमान तापमान 15 ते 20 तर कमाल 31 ते 34 डिग्री से राहणार
खान्देश सह मध्यमहाराष्ट्र -किमान तापमान हे 7 ते 14 तर कमाल तापमान 26 ते 31 डिग्री से. ग्रेड
मराठवाडा - किमान तापमान हे 9 ते 11 तर कमाल तापमान 29 ते 30 डिग्री से. ग्रेड
विदर्भ -किमान तापमान हे 9 ते 13 तर कमाल तापमान 28 ते 32 डिग्री से. ग्रेड राहणार आहे.
पुढील पाच दिवस म्हणजे 25 ते 29 डिसेंबर दरम्यान तापमानात अजुन वाढ होवून ऊबदारपणा जाणवेल.
मुंबईसह कोकण - किमान 17 ते 20 तर कमाल 32 ते 34 डिग्री से. ग्रेड,
खान्देश सह मध्यमहाराष्ट्र -किमान तापमान हे 9 ते 15 तर कमाल तापमान 28 ते 32 डिग्री से. ग्रेड
मराठवाडा - किमान तापमान हे 10 ते 12 तर कमाल तापमान 30 ते 32 डिग्री से. ग्रेड
विदर्भ -किमान तापमान हे 11 ते 15 तर कमाल तापमान 30 ते 33 डिग्री से.
त्यामुळे दरवर्षी नाताळ सणाला जाणवणारी तीव्र थंडी ह्यावर्षी जाणवणार नाही, असे वाटत असल्याचे खुळे म्हणाले.
वर्षाअखेर व नववर्षातील 30 डिसेंबर पासून थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईसह कोकण - किमान 12 ते 17 तर कमाल 26 ते 30 डिग्री से. ग्रेड,
खान्देश सह मध्यमहाराष्ट्र -किमान तापमान हे 5 ते 12 तर कमाल तापमान 26 ते 31 डिग्री से. ग्रेड
मराठवाडा - किमान तापमान हे 8 ते 11 तर कमाल तापमान 28 ते 30डिग्री से. ग्रेड
विदर्भ -किमान तापमान हे 8 ते 12 तर कमाल तापमान 27 ते 30 डिग्री से. ग्रे
वर्षाअखेरीस म्हणजे रविवार 29 डिसेंबर पासून हळूहळू थंडीत वाढ होवुन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
IMD Alert:थंडीचा कडाका प्रचंड वाढला, जळगाव 8.4 अंश, 'या' भागांत किमान तापमान कमालीचं घसरलं-IMD