Cold Weather : गारठा वाढला, राज्यात दोन दिवस थंडीचा कडाका कायम, विदर्भात पसरणार थंडीची लाट
Cold Weather : राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
![Cold Weather : गारठा वाढला, राज्यात दोन दिवस थंडीचा कडाका कायम, विदर्भात पसरणार थंडीची लाट cold wave hit maharashtra North Maharashtra Marathwada Vidarbha have dipped below Cold Weather : गारठा वाढला, राज्यात दोन दिवस थंडीचा कडाका कायम, विदर्भात पसरणार थंडीची लाट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/22/be7f5bb0cf949ad8c2a53dbe18ff9a31_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Cold Weather : राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका (Cold Wave in Maharashtra) कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात (Temperature) घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान 10 अंशाखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आला आहे. दिवसभर वातावरणात गारवा राहणार असल्याचंही हवामान विभागानं म्हंटलं आहे.
उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. धुळे जिल्ह्यात पारा 3. 4 अंशांवर घसरला आहे. परभणी जिल्ह्यात तापमान 8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. बुलढाण्यात तापमान 8.5 अंशांवर आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान 10 अंशावर पोहोचलं आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भामध्ये काही भागामध्ये तापामानाचा पारा 4-6 अंशावर पोहोचला आहे. मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक आणि पुण्यामध्ये मोसमातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
27 Jan, पुढील 2-3 दिवसात विदर्भात थंडीची लाट पसरण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासात थंड दिवसाची पण शक्यता आहे.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 27, 2022
- IMD Nagpur @RMC_Nagpur pic.twitter.com/COPS1ffgPg
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कायम असलेल्या थंडीची लाट महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये पसरली आहे. अहमदनगर(9 अंश), जळगाव(8.5 अंश), नाशिक(10 अंश) आणि पुणे (9.8 अंश) मध्ये पारा चांगलाच घसरला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात विदर्भात थंडीची लाट पसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Covid Guidelines : केंद्र सरकारने 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवले कोरोना निर्बंध, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय
- Omicron : कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती
- Viral New : सुरुंगाचा शोध घेणाऱ्या मागवा उंदराचा मृत्यू, हजारोंचे प्राण वाचवल्याबद्दल मिळालं होतं सुवर्ण पदक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)