एक्स्प्लोर

चलो अयोध्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत असंख्य शिवसैनिकही अयोध्येला जाणार

महाराष्ट्र सरकारच्या 100 दिवसपूर्तीला उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार असल्याची माहिती राऊत यांनी ट्विटरद्वारे दिली होती.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत असंख्य शिवसैनिकही सोबत असतील असं राऊत म्हणाले आहेत. ट्विटरवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी याआधीही ट्वीट करून याबाबत माहिती दिली होती. दुपारी श्रीरामाचं दर्शन घेऊन, संध्याकाळी शरयू आरती करतील असंही संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच आपल्या ट्वीटमधून ऐतिहासिक सोहळ्यात सामील होण्याचंही आवाहन शिवसैनिकांना केलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या 100 दिवसपूर्तीला उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार असल्याची माहिती राऊत यांनी ट्विटरद्वारे दिली होती.

29 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांच्या पाठिंब्यावर राज्यात सत्तास्थापन केली. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर (शिवाजी पार्क, दादर) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मार्च महिन्यात या सरकारला 100 दिवस पूर्ण होतील. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत.

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला मोठं यश मिळालं होतं. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. 15 जून 2019 रोजी उद्धव यांचा अयोध्या दौरा पार पडला.

त्याअगोदर 25 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु करण्यापूर्वी उद्धव यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. राम मंदिर हा शिवसेना-भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीपूर्वीचा महत्त्वाचा अजेंडा होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते.

संबंधित बातमी : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्या दौऱ्यावर, सरकारच्या 100 दिवसपूर्तीला श्रीरामाचं दर्शन घेणार

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget