एक्स्प्लोर
Advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या स्वागताला जाणार, उद्या पुण्यात मोदी-शाहांशी भेट
पुण्यात उद्यापासून (06 डिसेंबर) पोलीस महासंचालकाच्या तीन दिवसीय परिषदेला सुरुवात होत आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी दोन दिवस तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवस पुण्यात असणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्रातील सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. उद्यापासून (06 डिसेंबर) पुण्यात पोलीस महासंचालकाच्या तीन दिवसीय परिषदेला सुरुवात होत आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी दोन दिवस तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवस पुण्यात असणार आहेत. राजकीय शिष्टाचारानुसार या परिषदेपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील पंतप्रधानांच्या आगमनस्थळी उपस्थित असणार आहेत.
पुण्यातील पाषाण भागातील पोलीस रिसर्च सेंटर आणि आयसर या दोन संस्थांमध्ये ही तीन दिवसीय परिषद चालणार आहे. ही परिषद 6 डिसेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत होणार आहे.
या परिषदेत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गुप्तचर विभागाचे प्रमुख अरविंद कुमार, गृहविभागातील वरिष्ठ अधिकारी आणि देशातील वेगवगेळ्या राज्यांचे पोलिस महासंचालक उपस्थित राहणार आहेत. देशाच्या सुरक्षा धोरणांवर चर्चा करणे, देशांतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे आणि पुढील वर्षासाठी देशाच्या सुरक्षेचा रोडमॅप तयार करणे हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे.
आधीच्या सरकारच्या काळात ही परिषद दिल्लीमध्ये व्हायची. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर म्हणजे 2014 पासून त्यांनी दरवर्षी देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पोलीस महासंचालकांची ही परिषद घेण्यास सुरुवात केली. मागील वर्षी ही परिषद गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेलांच्या महाकाय पुतळ्याच्या परिसरात झाली होती. त्या आधी गुवाहाटी, गुजरातमधील कच्छचे रण, हैदराबाद आणि मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली या परिषदा झाल्या आहेत.
या परिषदेच्या निमित्ताने पुण्यात येणाऱ्या मोदी आणि शहांचा मुक्काम पुण्यातील राजभवनमध्ये असणार आहे . त्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी आधीच या सगळ्या परिसराचा ताबा घेतला आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबतची गेल्या 30 वर्षांपासूनची युती तोडली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. या सत्तास्थापनेसाठी तब्बल एक महिना राज्यात मोठी उलथापालथ झाली. या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे त्यांच्या मोठ्या भावाला भेटणार आहेत. त्यामुळे उद्या उद्धव मोदींसमोर कोणती भूमिका मांडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
भारत
राजकारण
Advertisement