एक्स्प्लोर
Advertisement
आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक : राणे
‘हिंसक आंदोलन थांबल्यास सरकार मराठा आरक्षणाबाबत तातडीने विचार सुरु करेल, असा दावा नारायण राणेंनी केला.
मुंबई : ‘मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन हिंसक झालं आहे, त्यामुळे आंदोलकांनी हे आंदोलन तुटेपर्यंत ताणू नये,’ असं आवाहन राज्यसभा खासदार नाणायण राणे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहेत, असंही नारायण राणे म्हणाले.
‘हिंसक आंदोलन थांबल्यास सरकार मराठा आरक्षणाबाबत तातडीने विचार सुरु करेल, असा दावा नारायण राणेंनी केला. सरकारने मराठा समाजाला विश्वास बसेल अशी भूमिका घ्यावी, असं मतही राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण मुख्यमंत्री आणि मराठा समाजाच्या नेत्यांना भेटलो असून, सकारात्मक भूमिका घेतल्यास दोन दिवसांत त्यांची भेट घडवून आणणार असल्याचंही राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंना शुभेच्छा
नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘राहुल गांधी यांच्यापेक्षा माझ्या शुभेच्छा महत्वाच्या आहेत. आणि अयोध्येपुढे हिमालय आहे,’ असा टोलाही राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
बातम्या
Advertisement